आरोग्य व शिक्षण

राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच ; आरोही तळेगावकर व भरत हरपुडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Spread the love

लोणावळा : लोणावळा शहर कॉग्रेसच्या सभागृहातील गटनेत्या व माजी उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर व भाजपचे माजी गटनेते व नगरसेवक भरत हरपुडे तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, सामाजिक कार्यकर्ते गणेश इंगळे यांनी गुरुवार (2 डिसेंबर) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत व मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

आरोही तळेगावकर ह्या काँग्रेसकडून दोन वेळा नगरसेवक झाल्या. तसेच त्यांनी उपनगराध्यक्ष व बांधकाम सभापती ही पदे ही भूषविली आहे. सत्तेत असूनही तळेगावकर यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भरत हरपुडे हेदेखील भाजपच्या चिन्हावर दोन वेळा निवडून आले होते. तळेगावकर व हरपुडे यांच्यासह अन्य काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

मागील काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरुच आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या तोंडावर या पक्षप्रवेशानी शहरात चर्चांना उधाण आले आहे.आगामी काळात सत्तेची समीकरणे बदलणार का ?अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!