आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता ५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत

Spread the love

तळेगाव : श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

कोविड १९ संकटामुळे १८ महिन्याच्या कालावधीनंतर प्रथमच इयत्ता ५ वी ते ७ वी विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन झाले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

शासनाद्वारे निर्गमित सर्व कोरोना नियमांचे पालन करूनच विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. विद्यालयातील सुरक्षिततेच्या उपायोजना पाहून पालकही निश्चिंत झाले आहेत.शाळा बंद असताना या 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू होते व स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील सर्व शिक्षक उत्तम तंत्रस्नेही शिक्षक बनले आहेत.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह व आनंद पहावयास मिळाला.शाळेच्या मुख्याध्यापिका शमशाद शेख, पर्यवेक्षिका रेणू शर्मा, शिक्षक धनश्री पाटील, प्रियंका पवार, आयशा मिन्ने, सिद्धेश्वर सोनवणे आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  संतोष खांडगे शालेय समिती अध्यक्ष रजनीगंधा खांडगे सचिव  मिलिंद शेलार यांनी विद्यार्थ्यांना स्वागतपर शुभेच्छा दिल्या व शालेय नियोजनाचे कौतुक केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!