आरोग्य व शिक्षण

ऊसतोड कामगारांना स्वप्नवेधच्या माध्यमातून अन्नधान्य वाटप

Spread the love

जुन्नर : आवकाळी पाऊसाने ऊसतोड मजूरांचे मोठे हाल झाले असून शिजवून खाण्यासाठी अन्नही नसणाऱ्या २७ परिवारांना स्वप्नवेधच्या माध्यमातून गहू, तादूळ , तेल , मीठ, मसाले , डाळी वाटप करण्यात आले.

स्वप्नवेध अनाथालयाच्या माध्यमातून कुठलेही शासकीय मानधन न घेता स्वप्नवेध अनाथ निराधारांचा संभाळ करत असताना सामाजिक विविध उपक्रम राबवत असतात. संस्थेचे संस्थापक शिवव्याख्याते सचिन भोजने व त्यांच्या पत्नी मंगल सचिन भोजने यांच्या माध्यमातून निराधारांना आधार देणेचे कार्य स्वप्नवेध करत असते.शिक्षणापासून वंचित असणाऱ्या वर्गाला शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे हा संस्थेचा मुख्य हेतु आहे.

आज पावसाने अनेक भटक्या , मेंडपाळ , ऊसतोड बांधवाचे जीवनमान हलाखीचे बनले असून या वर्गाला आपल्या मदतीचे आवश्यकता असून एक हात मदतीचा म्हणून स्वप्नवेध शेवटच्या श्वासापर्यंत समाजिक कार्य करत राहिल असे मत स्वप्नवेधचे संस्थापक सचिन भोजने यांनी मांडले यावेळी सरपंच भानुदासशेठ खराडे , भाऊसाहेब घोलप , सुभाष खराडे अदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!