आरोग्य व शिक्षण

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे बाबुराव वायकर यांनी केले ढोल ताशांच्या गजरात स्वागत

Spread the love

तळेगाव : येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांनी ढोल-ताशांच्या गजरात शाळेत स्वागत केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील जवळपास दोन वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा यासाठी सभापती बाबुराव वायकर यांनी हा उपक्रम राबविला

वडगाव मावळ मधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पोटोबा महाराज प्रांगण ते मुख्य बाजारपेठ अशी मिरवणूक काढली. वायकर यांनी स्वखर्चातून मुलांना खाऊ वाटप केला तसेच शिक्षकांच्या हस्ते मुलांना औक्षण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!