आरोग्य व शिक्षण

तळेगावात पार्किंगच्या जागेवर पथारी धारकांचे अतिक्रमण; कारवाई मात्र फक्त वाहनधारकांवर

Spread the love

तळेगाव : तळेगाव – चाकण महामार्गालगत शर्मा कॉम्प्लेक्स समोर आणि डीपी रोड लगत असणाऱ्या अनाधिकृत पथारी धारकांचा नागरिकांना आणि वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर असलेल्या पार्किंगच्या जागेत पथारी धारक बसल्याने नागरिकांना आणि गाळेधारकांना त्यांची वाहने रस्त्यावर लावावी लागतात. अशा प्रकारे लावलेल्या अनेक वाहनांवर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे वाहनधारक संतप्त झाले असून पार्किंगची जागा अनधिकृतपणे बळकावणार्‍या पथारी धारकांवर कारवाई का केली जात नाही ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अनेकदा तक्रारी केल्यानंतर एखादवेळेस कारवाई केली जाते. पण कारवाईसाठी पथक येण्यापूर्वीच्या पथारी धारकांना त्याची माहिती मिळते आणि ते आपला माल लपवून ठेवतात. भरारी पथक गेल्यावर पुन्हा परिस्थिती पूर्ववत होते. कारवाईची माहिती या पथारी धारकांना मिळतेच कशी? असा प्रश्न उपस्थित करत यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी शर्मा कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांनी केली आहे.

पर्यायी जागा असतानाही पथारी धारक बेकायदेशीररित्या पार्किंगच्या जागेत बसत आहेत. याबाबत नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी करून आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे आम्हा गाळेधारकांना रस्त्यावर गाड्या लावाव्या लागतात. याचा आम्हाला त्रास होत असून आमच्या गाड्यांवर दंड आकारला जातो. या सर्व प्रकाराला नगरपरिषद ,वाहतूक पोलीस व पीडब्ल्यूडी जबाबदार असून पथारी धारकांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शर्मा कॉम्प्लेक्स मधील गाळेधारकांनी आवाज दिवशी बोलताना केली.

 

या भागात बसणा-या पथारी धारकांमुळे कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. भाजीपाला विक्री झाल्यावर उर्वरित कचरा तेथेच टाकला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते.यामुळे नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक ठरणार्‍या, वाहतुकीला अडथळा ठरून अपघातांना निमंत्रण देणाऱ्या अनाधिकृत पथारी धारकांवर कारवाई होणार का? असा सवाल नागरिक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!