आरोग्य व शिक्षण

पवनमावळ कविभुषण विठ्ठल दळवी यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान

Spread the love

पवनमावळ : दारुंब्रे शाळेतील कोथुर्णे गावचे सुपुत्र पवनमावळचं कविभुषण विठ्ठल दळवी यांच्या कार्याची माहिती घेऊन , औरंगाबाद या ऐतिहासिक शहरांमधील उडान फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार २०२१ , प्रदान करण्यात आला.

समाजाला विचारांतुन जागे करण्याचे पवित्र कार्यच जणू दळवी यांनी हाती घेतले असुन , विचारच माणसाला जीवंत ठेऊ शकतात असे प्रभावी विचार समाजापुढे मांडत संताचा महिमा व गोडवा गात , छत्रपती शिवरायांच्या साहसी कार्याची महती , शिवरायांच्या पवित्र शिवचरित्राची आठवण करून देत समाजाला संतविचारांशिवाय पर्याय नाही तसेच पर्यावरणरुपी सुरू असलेला ऱ्हास थांबावा यासाठी प्रत्येकानं पुढे यावा , वन्यजीवांना जंगलात सुंदर जागा मिळावी , ऑक्सिजन पुरक वनस्पतींची जंगलात लागवड करून पर्यावरणातुन  सृष्टी वाचावी गोमातेची सेवा करावी,आरोग्यातुन देशसेवा व्हावी , यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती अभ्यासावी, यासाठी प्रत्येकानं मराठी भाषेची कास धरावी ,याच शिवकालीन मराठी राजभाषेस अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, यातुनच याच पवित्र देशाची अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेची घडी बसावी ,अशा अनेक विचार समाजापुढे मांडत समाजाला विचारांशिवाय पर्याय नाही , अशा अनेक गोष्टींची देशहिताची व देशसेवेची जाणीव करून देत एक हजार काव्यरचना करून समाजप्रबोधनाचे व समाजपरिवर्तनाचे प्रभावी कार्य हाती घेऊन देशाविषयी अभिमान असणारे मावळचे कविभुषण कविवर्य विठ्ठल दळवी यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत यावर्षीचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आजपर्यंत दळवी यांनी पवनमावळचे नाव उंचावत विचारांची पताका खांद्यावर घेऊन अनेक काव्यरचना करत महाराष्ट्रभर 19 राज्यस्तरीय पुरस्कार मिळवत प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्य लोकसेवा महासंघाचा लोकसेवा कविभुषण पुरस्कार, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचा जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळवत संतपरंपरेचा वसा वारसा जपत, छत्रपती शिवरायांच्या कार्याचा जागर करत, हिंदू धर्माचा आदर करत व परकीय संस्कृतीचा त्याग करत मराठी भाषा हि जगण्याची भाषा आहे याच मराठी राजभाषेचे महत्व पटवून देत संतांच्या विचारांतून महाराष्ट्र घडावा, यांसारखा दुसरा पर्याय नसावा, यासाठी प्रत्येकानं नैसर्गिक साधनसंपत्तीचा व मराठी भाषेची उरी कास धरावी, आरोग्यातुन देशसेवा व्हावी, यातुनच देशाच्या अर्थव्यवस्थेची व समाजव्यवस्थेची घडी बसावी, अशा अनेक प्रकारे देशाची व समाजाची सेवा करुन त्याचे हे पवित्र कार्य , विचार पुस्तक प्रकाशित करून लवकरच समाजापुढे आणण्याचा त्यांचा हा प्रभावी मानस आहे.

दळवी यांना मिळालेल्या पुरस्कारांबददल राष्ट्रीय अध्यक्ष शरदजी गोरे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद , महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर , वाळवा शिक्षण संस्थेचे सचिव , बी, एस पाटील , तळेगाव नगरीचे नगराध्यक्ष रविंद्रनाथ दाभाडे , आदर्श पत्रकार विलास भेगडे , रमेश फडतरे, गिरमे, गडेकर मुख्याध्यापक काशीनाथ निंबळे , दत्तात्रय जाधव संजयजी ओव्हाळ, पांडुरंग ठाकर, तांबे, दशरथ ढमढेरे यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!