आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

पीएमआरडीएला श्री एकविरा कृति समितीकडून निवेदन ;६० हजार तक्रारीचे काय झाले ? असा प्रश्न केला उपस्थित

Spread the love

लोणावळा : पीएमआरडीएला कार्ला व पंचक्रोशितील श्री एकविरा कृति समितीकडून अध्यक्ष व माजी जिल्हापरिषद सदस्य भाई भरत मोरे यांचेकडून ता.१६ रोजी निवेदन देण्यात आले. ;६० हजार तक्रारीचे काय झाले ? असा प्रश्न निवेदनातून विचारला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे पाठविण्यासाठी वडगाव शाखेचे पीएमआरडीए चे संदिप भंडारे यांना निवेदन देताना श्री.एकविरा कृति समिती अध्यक्ष भाई भरत मोरे , माजी सरपंच नंदकुमार पदमुले आणि शिष्टमंडळातील शेतकरी उपस्थित होते.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे स.नं.१५२/१५३ महाराज सयाजीराव गायकवाड उद्योग भवन ४ था मजला , औंध पुणे ४११०६७यांना एकविरा कृती समिती मावळ च्या वतीने भेटी साठी निवेदन दिले.

यावेळी जागृत नागरिक महासंघ महाराष्ट्र राज्य , माहिती अधिकार प्रचार-प्रसार संमिती मावळ विभाग पुणे,अध्यक्ष दत्तात्रय काजळे, उपाध्यक्ष दतात्रय दळवी , सचिव सुनिल गुजर यांचेकडून निवेदन देण्यात आले. सन २०२१ ते सन २०४१ या कालखंड साठी पीएमआरडीए या विभागाने पुणे जिल्ह्यातील ९ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण घातली आहे. वास्तवीक देशाचा,राज्याचा, जिल्हाचा, तालुक्याचा , शहराचा,गावाचा झपाट्याने लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.ही गोष्ट काळाची गरज आहे .पण शेतकऱ्यांना,घरमालकाला, जमिनी मालकांना संपर्कात घेऊन चौकशी करून मग पुढील विषय घेणे गरजेचे होते ; पण येथे सन २०१४ साली भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात आॕफिस मध्ये बसून धनदांडगे व बिल्डर आणि काही कंपन्या चे क्षेत्र डावलून आधीच शेतकरी भुमिहीन झाला. आणि राहिला त्यांच्या बोकांडी येऊ घातलेले आरक्षण, प्रकल्प म्हणजे नोकरी नाही, जमिनी नाही, पहिलेच मावळ वाशीच्या बोकांडी रेल्वे,धरणे, मुंबई- पुणे NH-४ , एक्स्प्रेस हायवे,एसीझेड, एमआयडीसी ,माॕटरो रेल्वे, हायपर रेल्वे येवढे प्रकल्प असताना PMRDA ने येऊ घातलेले आरक्षण मंडळी ज्याने पैई,पैई करून घर,बंगला बांधला त्यावर PMRDA ने आरक्षण चा नांगर फिरवला, ज्याने मुलांचे,नातूचे,पुढच्या पिढीचे स्वप्न पाहिले त्यावर PMRDA ने आरक्षण नावाचा नांगर फिरवला. कुणाची एक गुंठा , १ एकर,५ एकर त्यामधून रस्ता, प्लेग्राऊंन्ड, कचरा डेपो,वनीकरण,शेती झोन, व रस्ते पण अशी अनेक आरक्षण टाकली आहेत ; पण ज्याच्या १०० एकर,५०० एकर,१००० एकर बिल्डर , उद्योजक, राजकीय मंडळी यांच्या जमिनी वाचून त्यांना शेतकर्यांच्या जमिनीतून बिनधास्त पणे डिपी रस्ते टाकले.


यासाठी सुमारे ६०, ००० हजार तक्रारी आल्या आहेत. त्याचा आज पर्यंत काही विषय झाला नाही. म्हणून
ता.८ आॕगष्ट रोजी रस्ता रोको आंदोलन कर्ला मावळ येथे मुंबई पुणे जुन्या महामार्गावर करण्यात आले होते. तेव्हा आपल्या कार्यालयाकडून एक प्रतिनिधी पाठवला होता . त्यांनी निवेदन स्विकारले व पुढील काही दिवसांत मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे यांची भेट करून देतो ,असे अश्वासन दिले होते ;पण ते पाळले गेले नाही .म्हणून ता..१६ रोजी पीएमआरडीए ला यांना निवेदन देऊन ता..२० डिसेंबरला रोजी एकविरा कृती समिती व बांधीत शेतकरी शिष्टमंडळ भेटीसाठी येणार आहे .तरी आपण आपला वेळ चर्चासत्र साठी द्यावा , म्हणून निवेदन देत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!