आरोग्य व शिक्षण

आंबवणेमध्ये दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

Spread the love

आंबवणे : गावातील श्री दत्त मंदिरात दरवर्षी प्रमाणे गुरुदत्त उत्सव मंडळ यांच्या वतीने श्री दत्त जन्मोत्सव आयोजित करण्यात आला.अतिशय उत्साहात दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी सोनू अनाजी वाळंज विद्यालय, व जिल्हा परिषद केंद्र शाळा आंबवणे यातील विध्यार्थ्यानी भाला फेक, गोळा फेक धाळी फेक, धावणे, संगीत खुर्ची या विविध क्रीडा स्पर्धात सहभाग घेऊन बक्षीस मिळवले.

तसेच सामाजिक अंतर राखत अतिशय उत्तम प्रकारे वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. गायन, वेशभूषा, वादक, उत्कष्ठ फुगडी यात विदयार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली. विद्यार्थी व महिला ह्यांनी उत्साहात सहभाग घेतला.

याप्रसंगी ह. भ. प. पारकर गुरुजी व सहकारी यांचे भजन व ह भ प कृष्णा महाराज पडवळ, चांदिवली यांचे शुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.मावळातील शेटे महाराज यांचे भजन, महिला भजन मंडळ कुभेरी, भजनी मंडळं कोळवली, भजनी मंडळ आंबवणे, यांनी सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला.या उत्सव प्रसंगी मा. आमदार राम कदम घाटकोपर मुंबई. यांनी भेट दिली. त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

जन्मोत्सव पाळणा,आरती नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.आंबवणे व परिसरातील भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!