आरोग्य व शिक्षण

कोरोना योद्धा पुरस्कार देऊन महाराष्ट्रातील जयहिंद संघटनेनी केली जागतिक विक्रम करत वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन मध्ये नोंद

Spread the love

पुणे : कोरोना काळात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन महाराष्ट्रातील जयहिंद संघटनेनी जागतिक विक्रम करत वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन मध्ये नोद केली आहे.

महाराष्ट्रात कोवीड 19 आजराने धुमाकूळ घात ला होता अनेक लोक मृत्युंमुखी पडले.अनेकांचे संसार उध्वस्त झाले. अनेकांचा रोजगार गेला. लॉकडाऊन काळात अनेकांना उपास्मारीची वेळ आली होती. अशा वेळी अनेक दानशूर व्यक्ती संस्था पोलीस प्रशासन, डॉक्टर परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी सफाई कामगार राजकीय व सामाजिक मंडळीनी आपापल्या परीने मदतीचा हात दिला. अशा प्रत्येक कोरोना योद्यांना जयहिंद संघटनेने सलग 18 महिने म्हणजे 551 दिवस पुरस्कार प्रदान करून अशा लोकांना प्रोत्साहन दिले सलग एव्हढे पुरस्कार देणारी संस्था म्हणून वर्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.

 


हा पुरस्कार एम आय टी कॉलेज व वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रमुख डॉ. विश्वनाथ कराड यांचे सुपुत्र संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या हस्ते स्वीकारण्यात आलाा

या वेळी जयहिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील यशवंत नवले तसेच वरिष्ठ सल्लागार मंदा नाईक, स्वाती सुनील नवले जितेंद्र उर्फ बाबू घोष, दिवाकर घोटीकर सल्लागार समिती सदस्य, सुरेश तुरे आदि उपस्थित होतेे.

आम्ही हा उपक्रम असाच चालू ठेवणार असून गरजूना जास्तीत जास्त मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील जास्तीत जास्त कोरोना योद्धा पुरस्कार देणारी ही महाराष्ट्रातील ही पहिलीच संस्था असावी असे उदगार सुनील नवले यांनी या वेळी काढले.महाराष्ट्र बाहेर व परदेशात ही 11 कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!