आरोग्य व शिक्षण

नॅशनल हेवी कंपनी पूर्ववत सुरू करा – कृती समितीची मागणी

Spread the love

तळेगाव : येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनी पूर्ववत सुरू करावी अशी मागणी नॅशनल इंजिनीयरींग सहकारी कंपनी बचाव कृती समितीने केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष व नॅशनल हेवी इंजिनिअरिंग  कंपनीचे कामगार गणेश भेगडे यांनी अमित शहा यांना निवेदन दिले आहे .यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आमदार राहुल कुल मा.राज्यमंत्री बाळा भेगडे जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके आदी उपस्थित होते.

कंपनी गेली अनेक वर्षापासून बंद आहे येथील कामगारांना चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापन कंपनी पूर्ववत सुरू करून उत्पादन सुरू करू अशी पोकळ आश्वासने देतात. कंपनीने आतापर्यंत कोणतीही प्रगती केली नाही. सहा वर्षापासून उत्पादन बंद केले आहे. पैशाअभावी कामगारांना अत्यंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कामगारांचे संसार मोडीत निघाले आहे. अनेकांना कुटुंबाच्या गरजा भागविणे कठीण झाले आहे. परंतु व्यवस्थापन कोणतीही दखल घेत नाही असे निवेदनात म्हटले आहे.

कंपनीच्या ताब्यातील वाढीव जागेची शासकीय कामकाजासाठी विक्री करावी व त्यापोटी मिळणारी रक्कम कंपनीने कर्ज फेडण्यासाठी व कामगारांचे थकीत पगार देण्यासाठी खर्च करावी. कामगारांना याबाबत सहकार्य करावे असे निवेदन कृती समितीने शहा यांना दिले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!