आरोग्य व शिक्षण

बंगळूरूतील शिवछञपती पुतळ्याची विटंबनेचा लोणावळ्यात तीव्र निषेध ; महाराज्यांच्या पुतळ्यास शिवसेनेकडून दुग्धाभिषेक

Spread the love

लोणावळा :  बंगळूरूतील शिवछञपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचा लोणावळ्यात तीव्र निषेध करण्यात आला. पुतळ्यास दुग्धाभिषेक शिवसेना पुणेजिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहीर यांचे हस्ते करण्यात आला.तसेच पुष्पहार आर्पण करण्यात येवून कर्नाटकातील या घटनेचा व मुख्यमंत्री यांचे वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आहीर म्हणाले , महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत अखंड हिंदुस्थानात जनतेच्या मनात ,हृदयात ज्यांनी विश्वास निर्माण केला . सर्व जाती धर्मातील लोकांना एकजुट करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले ,,त्या छञपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याची विटंबना केल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.तसेच कर्नाटक चे मुख्यमंत्री यांनी या घटनेबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल त्यांचा निषेध करतो व त्यांनी राजीनामा देण्याची मी मागणी करतो.

यावेळी लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक,लोणावळा नगरपरिषदेच्या विरोधीपक्षनेत्या शादान चौधरी , वाहतूक सेना जिल्हा सचिव गिरी गोसावी ,उपतालुकाप्रमुख नरेश काळवीट, माजी नगराध्यक्ष राजूशेठ गवळी ,शिवसेना महिला आघाडी संघटिका संगीता कंधारे , लोणावळा शहर समन्वयक जयवंत दळवी ,शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, नगरसेवक शिवदास पिल्ले , नगरसेविका सिंधू परदेशी , युवासेना विभाग आधिकारी नितीन देशमुख ,उपशहरप्रमुख मनेष पवार, विभागप्रमुख मंगेश येवले, रविंद्र टाकळकर, उल्हास भांगरे , पुणे विद्यापीठ कक्ष अध्यक्ष विशाल हुलावळे , बाळासाहेब मोहोळ, संजय शिंदे ,नागेश दाभाडे , प्रशांत आजगेकर, किशोर भांगरे ,अशोक गवारणे, ओंकार फाटक, किशोर नरोडे, पराग राठी ,धनेश हुंडारे, शाखाप्रमुख संजय जाधव,जितेंद्र ठोंबरे , गणेश जाधव, धिरज घारे, विकास घाटे, दिपक काळे, कुणाल सपकाळ , उमेश शिरंबेकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!