आरोग्य व शिक्षण

लोणावळ्याच्या नगराध्यक्षांचे काम शिस्तबद्ध असल्याने लोणावळ्यात २०२० च्या पहिल्या लाटेत कोरोना फिरकला नाही – विठ्ठल सुर्यवंशी

Spread the love

लोणावळा : लोणावळ्याच्या नगराध्यक्षांचे काम शिस्तबद्ध असल्याने लोणावळ्यात २०२० च्या पहिल्या लाटेत कोरोना फिरकला नाही .नगराध्यक्षा सुरेखाताई यांचे कौतुक करावे तितके कमी आहे.राज्यातील कॕबिनेट मंञ्यांचा पी.ए.आय एस आय अधिकारी यांनी राञी आकरानंतर फोनवर कोरोना काळात लोणावळ्यात कामासाठी फोन केला असता ताईंनी नियमांकडे बोट दाखवून त्यांना सवलत दिली नाही ,असे मावळ तालुक्याचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी म्हणाले.

श्री एकविरा सहकारी पतसंस्थेच्या कॕलेंडरचे प्रकाशन सहाय्यक निबंधक सुर्यवंशी यांचे हस्ते आणि लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव , पुणे जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे , तसेच माजी शिक्षण मंडळ सभापती विनय विद्वांस तसेच श्री एकविरा सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॕड.जयवंत देशमुख व संचालक सुरेश गायकवाड यांचे हस्ते झाले .यावेळी श्री.सुर्यवंशी बोलत होते.

ते पतसंस्थेच्या ठेवी वाढीसाठी पुढे म्हणाले , लोणावळा नगरपरिषदेने देशात दुसरा क्रमांक मिळविला असून नगराध्यक्षांचे काम चांगले आहे. पतसंस्थेचे भाग भांडवल व ठेवी वाढण्यासाठी सर्व पतसंस्थेने एकञ यावे.लोणावळ्याच्या हद्दीत शेकडो बंगलेवाले व सोसायटी वाले श्रीमंत आहेत.इथे बंगल्यात राहतात पण रहिवासी मुंबई पुण्याचे आहेत. त्यांचेकडून ठेवी मिळाल्यास पतसंस्था वाढतील, बंद पडणार नाही. तारणावर कर्ज द्यायलाही काही अडचण येणार नाही.श्री एकविरा पतसंस्थेचे कार्य ग्रामिण भागात चांगले आहे. सभासदांना व सर्वांना त्याचा लाभ होत आहे.

यावेळी लोणावळा नगरपरिषदेचा देशात दुसरा क्रमांक आल्याबद्दल नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांचा शाल ,श्रीफळ ,स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून पतसंस्थेच्यावतीने  सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्षा श्रीमती सुरेखाताई जाधव म्हणाल्या , आम्ही २१वर्षापूर्वी पतसंस्था काढली आसून , नगरपरिषदेचे मत मागायला गेलो असता काही कर्जदार व कारवाई , वसुली केलेले कर्जदार यांनी इथे कशाला आल्या म्हणून आम्हाला हाकलून लावले. कर्ज थकल्याने कालच दोन दुचाकी आम्ही ओढून आणल्या आहेत. लोणावळा नगरपरिषदेच्या दुसऱ्या क्रमांकाचा गौरव राष्ट्पती रामनाथ कोविड यांचे हस्ते झाल्याबद्दल मी लोणावळेकर नागरिकांची आभारी आहे .नागरिकांकडून चांगले सहकार्य मिळाले आसल्याने हा पुरस्कार मिळाला. कोट्यावधी रूपयांची कामे झाली.स्वच्छ लोणावळा सुंदर लोणावळा या आभियानात सर्वांनी सामिल व्हावे.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल शरद हुलावळे यांचा सत्कार करण्यात आला. श्री हुलावळे यावेळी म्हणाले, स्वर्गीय दादा तथा रामचंद्र देशमुख यांनी हे लहान रोपटे लावला , त्याचा मोठा वटवृक्ष झाला आहे.या पतसंस्थेच्यावतीने लोकांना चांगल्या सेवा मिळोत. तसेच पतसंस्थेच्या ठेवी वाढून तिचे बँकेत रूपांतर होवो,अशी शुभेच्छा देतो. पतसंस्थेचे संचालक व माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड म्हणाले, स्वर्गीय दादासाहेब देशमुख यांनी सन २०००मधे या संस्थेच्यावतीने कार्यांची मूहूर्तमेढ रोवली.आज या संस्थेचा वृक्ष झाला आहे.पतसंस्था चालविताना अनेक अडचणीवर मात करावी लागते,आज त्यामुळे पतसंस्था नफ्यात आली आहे.

प्रास्तविक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आॕड.जयवंत देशमुख यांनी केले. ते म्हणाले. श्री एकविरा सहकारी पतसंस्थेचे १२ लाख भांडवल होते,आता पाच कोटीवर ते गेले आहे.पंधरा लाखापर्यंत कर्जवाटपाला परवानगी मिळाली आहे.,संस्थेच्यावतीने आम्ही पंचक्रोशित चांगल्या घडामोडी घडत असल्यामुळे कोरोनाच्या काळातून जरा बाहेर येवून मान्यवरांचे कौतुक व पंचक्रोशितील पतसंस्था यांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम व नववर्षाचे कॕलेंडरचे प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर यांचेही भाषण झाले. भगवान अग्रसेन महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष राजीव आगरवाल याःनी मनोगतात सर्व पतसंस्था यांचेतर्फे एकञ बैठक घेवून अडीअडचणी सोडवता येतील,असे सांगितले .

 

यावेळी पतसंस्थेचे संचालक व माजी सरपंच अंकुश देशमुख, सचिन देशमुख, सुरेश गायकवाड , संचालिका सौ.मनिषा देशमुख , व्यवस्थापक आशिष पाठारे , रोखपाल निखिल देशमुख , ज्योतीताई केदारी , आणि कर्मचारी उपस्थित होते. सूञसंचालन व्यवस्थापक श्री.पाठारे यांनी केले. आभार रोखपाल ज्योतीताई केदारी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!