आरोग्य व शिक्षण

विस्कळीत पाणीपुरवठ्याला प्रशासनावरील दबाव कारणीभूत- जनसेवा विकास समिती

Spread the love

तळेगाव : गेले चार-पाच दिवसांपासून तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरातील विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठ्याला प्रशासनावरील दबाव कारणीभूत असल्याचा थेट आरोप जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी आज आवाज न्युजशी बोलताना केला.

17 डिसेंबरला एक मोटर खराब झाल्यानंतर त्या संदर्भात नगरपालिकेला लेखी रिपोर्ट करण्यात आला होता. त्यानंतर ही ती मोटार दुरुस्त झाली नाही. दोन स्टॅंडबाय मोटर मध्ये एक खराब झाल्यानंतर दुसऱ्या मोटारीने पाणी पुरवठा सुरू झाला. परंतु 22 डिसेंबर रोजी दुसरी मोटर खराब झाली असे असतानाही नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष का केले? असा सवाल आवारे यांनी केला.

वर्षानुवर्षे ठेकेदार व कामगार नागरिकांना वेठीस धरत आहेत. जाणीवपूर्वक पाणीपुरवठा विस्कळीत करण्याचे काम केले जाते.पाणी ठेकेदार कोणाच्या इशार्‍यावर काम करतो? त्याच्या मागचा बोलविता धनी कोण आहे? त्याच्या कामात क्वालिटी नसतानाही त्याला काम कसे दिले जाते ?असे कित्येक प्रश्न किशोर आवारे यांनी उपस्थित केले.

पाणी ठेकेदाराचे साडेतीन कोटींचे बिल कोणालाही न विचारता काढले जाते. तर तळेगाव शहरासाठी नियमितपणे काम करणाऱ्या विशाल ईलेक्ट्रिकल याला अजूनही वर्क ऑर्डर चे टेंडर दिले जात नाही. त्याचे बिल काढले जात नाही. तळेगाव शहरात सुरू असणार्‍या पाण्याच्या पाइपलाइनच्या कामातही गलथानपणा केला जातोय असेही ते म्हणाले.

पाणी सभापती स्वतः जातीने लक्ष घालून काम करून घेतात.मात्र जनतेला रील स्टारची भुरळ पडली आहे. रियल स्टारकडे यामुळे लोकांचे दुर्लक्ष होत आहे असा टोला कोणाचेही नाव न घेता आवारे यांनी लगावला.

या रील स्टार कडूनच प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचे आवारे यावेळी म्हणाले. चार वर्षांपूर्वी लोणावळा व तळेगाव पाणी योजना मंजूर झालेल्या असताना लोणावळ्यातील पाणी योजना  पूर्णत्वास गेली आहे. तर मग तळेगावात पाणी योजना का पूर्ण होत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तळेगावची पाणी योजना कोणी बासनात बांधून ठेवली आहे? त्याच्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे? याचा खुलासा लवकरच करणार असल्याचे आवारे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!