आरोग्य व शिक्षण

लोणावळा नगरपरिषदेच्या सायकल रॕलीला चिञपट अभिनेता सिध्दार्थ जाधव यांची हजेरी

सुमारे सातशे,आठशे विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग

Spread the love

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा या स्पर्धेसाठी आयोजित सायकल रॕलीला चिञपट अभिनेता सिध्दार्थ जाधवची हजेरी , सातशे आठशे सायकलस्वार विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग यात पहायला मिळाला. तसेच प्लग ए थाॕनसाठी नगरपरिषदेचे कर्मचारी व लोकप्रतिनिधी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.

लोणावळा नगरपरिषदेच्या सायकल रॕलीला चिञपट अभिनेता सिध्दार्थ जाधव आणि माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी झेंडा दाखवून सायकल रॕलीला प्रारंभ झाला. यावेळी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांनी भाषणातून लोणावळेकर नागरिक व विद्यार्थी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचेकडून सहकार्य मिळाल्याबद्दल व नगरपरिषदेचा देशात दुसरा क्रमांक मिळाल्यावरून सर्वाचे आभार मानून पुढील वर्षी पहिल्या क्रमांक मिळविण्यासाठी सहकार्य करा. रोज घरातील कचरा चार भागात जमा करून नगरपरिषदेच्या घंटागाडीत टाका , असे अवाहन केले.

ओल्या कच-यापासून कंपोस्ट खत तयार करून कचरा घरातच जिरवा. मुलांच्या मोडक्या खेळण्यांचा टाकावू पासून टिकाऊ करण्याचा प्रयत्न करा ,आसे त्यांनी आवाहन केले. यावेळी लोणावळा सायकल क्लब , जेष्ट नागरिक संघ,सर्व शाळांचे विद्यार्थी , विद्यार्थीनी व नागरिक , पञकार या सायकल रॕलीत व प्लग ओ थान मधे सहभागी झाले होते.

यावेळी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे , माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक श्री.पुजारी , नगरसेवक व भाजप गटनेते देविदास कडू, ललित सिसोदिया ,नगरसेविका बिंद्रा गणाञा , माजी उपनगराध्यक्षा सुवर्णा अकोलकर , संध्या खंडेलवाल, आरोग्य समिती सभापती रचना सिनकर , नगरसेविका व सभापती मंदा सोनवणे , माजी नगरसेवक विशाल पाडाळे , आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूञसंचालन राजेंद्र दिवेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!