आरोग्य व शिक्षण

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज विद्यार्थ्यानी केले वंचिताना केक व बिस्किटे वाटप

Spread the love

चिंचवड : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई) दरवर्षी  नववर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आज ३१ डिसेंबर निमित्त प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेजमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्ताने इयत्ता १० वी,११ वी व १२ वी च्या विदयार्थ्यांसाठी नववर्षाभिनंदनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

कॉलेजच्या सेवा या शैक्षणिक कृती कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इतर वर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून पोस्टर बनविणे व पाक कलेची शिकवण देण्यात आली. विद्यालयाच्याशिक्षिका अनिशा अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना पाककला शिकविल्या. केक बनविणे व बिस्कीटे बनविण्याच्या कलाकृतींबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.याबरोबर समाजातील आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी चौका-चौकातगरजू लोकांना व संतमुनीबाबा वृद्धाश्रमात जाऊन केक व बिस्कीटेवाटप केले व त्यांच्या प्रती विद्यार्थ्यांनी मानवतेचीभावना दाखविली.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली व सर्वांनानवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यातूनच भारताचीउद्याची उज्ज्वल पिढी घडविण्यास मदत होईल, असे मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!