आरोग्य व शिक्षण

हिवाळी अधिवेशनात मावळसाठी ५७ कोटी २७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध

विविध विभागांच्या माध्यमातून मावळतील विकास कामांसाठी सुमारे १४३ कोटी ३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध

Spread the love

वडगाव मावळ : मुंबई येथील राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार सुनिल शेळके यांच्या विशेष पाठपुराव्याने मावळ तालुक्यातील विकास कामांसाठी सुमारे ५७ कोटी २७ लाख ७२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून विविध विभागाच्या माध्यमातून सुमारे १४३ कोटी ३ लाख रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्या आहेत. असे एकूण सुमारे २०० कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी शुक्रवारी (दि.३१) पत्रकार परिषदेत दिली आहे.

२०२१ च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीच्या अंतर्गत आमदार सुनिल शेळके यांनी मावळ तालुक्याच्या विकास कामांसाठी निधीची मागणी करून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी ३५ कोटी, आदिवासी भागातील रस्त्यांसाठी ९० लाख रुपये, वडेश्वर येथील शासकीय आश्रमशाळेच्या बांधकामासाठी १० कोटी ७५ लक्ष, तालुक्यातील ७ मंडल अधिकारी कार्यालये व ४३ तलाठी कार्यालयांच्या इमारतींसाठी १० कोटी १९ लक्ष, तळेगाव दाभाडे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाची संरक्षण भिंत बांधण्यासाठी ४३ लाख ७२ हजार असा एकूण ५७ कोटी २७ लाख ७२ हजार रुपयांचा निधी हिवाळी अधिवेशनातून उपलब्ध झाला आहे.


यामध्ये तालुक्यातील कान्हे फाटा ते सावळा रस्त्याच्या कामासाठी ५ कोटी, कामशेत पवनानगर रस्त्यासाठी १० कोटी, आंबी येथील पूल जोड रस्त्यासाठी १ कोटी ५० लाख, सोमाटणे- दारुंब्रे’कासारसाई-पुसाणे रस्त्यासाठी ७ कोटी, नाणे-साई-टाकवे-भोयरे- सावळा रस्त्यासाठी ७ कोटी, वडगाव शहर अंतर्गत रस्त्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी तसेच आदिवासी भागातील कळकराई ते मोग्रज रस्त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी, जिल्हा मार्ग २२ ते माऊ रस्त्यासाठी ४० लाख, वडेश्वर येथील आदिवासी आश्रम शाळेच्या शालेय इमारतीसाठी १० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील अनेक भागांमध्ये महसूल विभागाची मंडल व तलाठी कार्यालये नसल्याने अनेक गावचे मंडल अधिकारी व तलाठी तालुक्याच्या ठिकाणी थांबत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. नागरिकांना मंडल अधिकारी व तलाठी आपल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध व्हावेत यासाठी मावळात महसूल विभागाची ७ मंडल कार्यालये व ४३ तलाठी कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासाठी सुमारे १० कोटी १९ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन घेतला आहे.

जिल्हा नियोजन समिती मार्फत ग्रामीण भागातील व नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील विकास कामांसाठी एकूण ७३ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहेत. महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण अंतर्गत ९ पाणी पुरवठा योजनांसाठी ४३ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

तसेच नाबार्ड अंतर्गत सोमवडी ते शिरदे रस्ता व कुंडलिका नदीवरील पुलाचे व जोडरस्त्याचे काम करणे यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीस व गृह विभागांतर्गत लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामासाठी १० कोटी ७६ लाख, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामासाठी ३ कोटी, लोणावळा येथील पोलीस वसाहतीच्या इमारतीच्या बांधकामासाठी ३ कोटी रुपये व जल जीवन मिशन अंतर्गत शिवली, खांडी, कुसुर,नाणोली,ओझर्डे या पाच गावच्या नळ पाणी पुरवाठा योजनांसाठी सुमारे ३ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी अशा एकूण २५ कोटी ३३ लाख रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

असे एकंदरीत विविध विभांगांतर्गत व हिवाळी अधिवेशन यांचे मिळून मावळ तालुक्यातील विकास कामांसाठी तब्बल २०० कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून पुढील वर्षात प्रामुख्याने पवना धरणग्रस्तांचा प्रश्न प्रामुख्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार शेळके यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!