आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

कलापिनी सांस्कृतिक केंद्रात जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य दिमाखदार वर्षांत महोत्सव संपन्न

Spread the love

तळेगाव : कला संस्कृतीच्या संगमावर, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कलापिनी सांस्कृतिक केंद्रात जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य दिमाखदार वर्षांत महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाइव्ह माध्यमातून कार्यक्रम संपन्न झाला. कलापिनी आणि मा. आ. कृष्णराव भेगडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षांत महोत्सवाचे आयोजन केले होते. महोत्सवाचे हे २० वे वर्ष होते. पुणे, पिंपरी चिंचवड, निगडी, वडगाव, इंदोरी, तळेगाव येथील जवळपास ३०० कलाकार कार्यक्रमात सहभागी झाले होते. अगदी ४ वर्षांच्या बालकांपासून ७० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत कलाकारांचा सहभाग होता.

यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष दीपक बाळसराफ, राजेश म्हस्के, राजश्री म्हस्के, कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, विश्वस्त डॉ. अनंत परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमात अशोक संभूस, सुलभा संभूस, मोहन कुंटे, माधुरी कुंटे, प्रदीप जोशी, प्रतीक्षा जोशी यांना वर्षांत सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संदीप शिंदे, राजश्री धोंगडे आणि विपुल परदेशी यांना वर्षांत सितारा या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. कलापिनीच्या कलादर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

दिगंबर कुलकर्णी यांच्या भक्तिगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रेश्मा वर्पे आणि समूह यांच्या वतीने गणेश वंदना सदर करण्यात आली. कलापिनी कुमारभवनच्या मी डोलकर या कोळी नृत्याने रसिकांची मने जिंकली. एम डी ए जुनिअर आणि सिनिअर ग्रुपच्या वतीने बहारदार नृत्य सदर करण्यात आली. सायली गोविंद यांच्या खेळ मांडीयेला, कुणाल प्रसाद यांच्या बॉलीवूड फ्युजन, आयुषा फिटनेस च्या रेट्रो फ्युजन या नृत्यांनी बहार आणली. वडगावच्या एडीसी समूहाने लोकनृत्य सादर केले. स्वप्नील झलकी यांनी सूर निरागस हो हे गीत सादर केले. दिग्जया झलकी यांनी या गीतावर शास्त्रीय नृत्य केले. छबीदार छबी ये दिलखेचक नृत्याने वन्स मोअर मिळवला. नादब्रह्म संगीतालयाच्या वतीने गीते सादर करण्यात आली. संदीप शिंदे यांच्या मल्लखांब आणि योगासनांच्या चित्तथरारक सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये ५० कलाकारांचा सहभाग होता. सचिन इंगळे आणि ग्रुपने मृदुंग वादन केले. संचय अकादमीच्या वतीने शास्त्रीय नृत्याविष्कार सदर झाला. श्रुती कुलकर्णी यांच्या निगाहे मिलाने को तसेच सुमेर नंदेश्वर यांच्या चोरीचा मामला, स्टेप हार्ड डान्स अकादमीचे फ्युजन नृत्य, एडीसी समूहाचे हिप हॉप या कार्यक्रमांनी रसिकांची वाहवा मिळवली. विपुल परदेशी आणि अविनाश शिंदे यांच्या डान्स मेनिया या ग्रुपच्या सुंबरान या नृत्य प्रकाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

विजय कुलकर्णी, संदीप मन्वरे यांनी रंगतदार सूत्रसंचालन केले. सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. विनया केसकर यांनी केले. अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी स्वागत केले. परांजपे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी आभार मानले. अनघा बुरसे, ज्योती ढमाले, मधुवंती रानडे, सायली रौंधळ यांनी व्यवस्थापन केले. सुमेर नंदेश्वर यांनी ध्वनी संयोजन केले. चेतन पंडित, शार्दुल गद्रे, आदित्य धामणकर, स्वच्छंद गंदगे, हरीश पाटील, अभिलाष भवार, जितेंद्र पटेल, वेदांग महाजन यांनी संयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!