आरोग्य व शिक्षण

कार्लाच्या श्री एकविरा देवीचे गडावर रोप वे ची गरज ;उपचारास विलंब झाल्याने विश्वस्थाचा मृत्यू – मोरेश्वर मातेरे

Spread the love

लोणावळा : कार्लाच्या श्री एकविरा देवीचे गडावर रोपवे ची गरज आहे , मंदिरात चक्कर येवून खाली कोसळून उपचारास विलंब झाल्याने विलास मधुकर कुटे (वय ५०, रा-वेहेरगाव,ता-मावळ) या अभिषेक करत असताना श्री एकविरा देवस्थानचे विश्वस्थाचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला.

श्री एकविरा देवीचे मंदिर ते गडपायथा हे जास्त अंतर व पायऱ्या असलेल्या मार्गामुळे तात्काळ उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना ता.२ जानेवारी रोजी घडली , असून अजून किती भाविक व भक्त यांचा बळी सरकार घेणार , असे कामगारनेते व मृत विश्वस्त विलास कुटे यांचे मामा मोरेश्वर मारूती मातेरे यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे.

श्री एकविरा देवस्थानचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय अनंत तरे यांचे खांद्याला खांदा लावून कै.विलासराव कुटे यांनी अनेक वर्षे काम केलेले आहे. श्री एकविरा देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर वनखाते यांचा रस्ता व वाहनतळ यास जागा उपलब्ध करून देण्यापासून वाहनतळ सुसज्ज बनविणे , स्वच्छतागृह , पिण्याच्या पाण्याच्या टाकी चे काम मंदिराजवळ भाविक भक्तांच्या करीता सुसज्ज दर्शनरांग बांधणे तसेच दरडी कोसळू नये यासाठी उपाययोजना करणे तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात सुशोभिकरणाचे काम आदी अनेक कामे मार्गी लावली. गड पायथा ते गडापर्यत विजेच्या खांबावर विद्युत दिवे ,ट्युब बसविणे तसेच श्री एकविरा जोगेश्वरी पायथा मंदिराचे जवळच पार्कींगची व्यवस्था तसेच स्वच्छतागृह , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी कामे मार्गी लावली आहेत. रोप वे चे काम जर वाहनतळापर्यत झाल्यास एखाद्या भाविक भक्ताला गडावर अपघात झाल्यास तात्काळ रोप वे ने नेणे शक्य होईल. वयोवृध्द भाविक भक्त , लहान मुले आसलेले महिला तसेच आजारी व्यक्ती , यांना या रोप वेचा लाभ होईल. रोप वे मुळे व्ही आय पी लोकांची ही सोय होईल. गर्दी टाळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे हे नवराञौत्सवाच्या काळात किंवा चैत्र याञेला येऊ शकले नाहीत. रोप वे नसल्यामुळे प्रचंड नुकसान या गडावर येणारे जाणारे भाविक भक्तांचे होत आहे.

रायगड किल्यावर , तसेच गिरनार पर्वतावर जसे ठिकठिकाणी रोप वे आहेत,तसेच रोप वे श्री एकविरा देवीच्या मंदिरात जाण्यायेण्यासाठी उभारायला हवेत. एकीकडे नागपूर , मुंबई , पुणे , दिल्ली येथे मेट्रोची कामे व विविध टप्पे बनविण्यासाठी राज्य व केंद्र सरकार सदैव तत्पर असते.पण धार्मिक ठिकाण श्री एकविरा देवी मंदीर व कार्लालेणी हे पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण असताना राज्य सरकार व केंद्र सरकार माञ इकडे दूर्लक्ष करीत आसून यात तातडीने पावले उचलावीत ,अशी मागणी कामगारनेते मोरेश्वर मारूती मातेरे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!