आरोग्य व शिक्षण

२४३ वर्षांपूर्वीच्या मराठा युद्धाचा विजय दिवस साजरा

Spread the love

तळेगाव : ९ जानेवारी १७७९ साली तळेगाव दाभाडे मधील खिंडीत मराठे व ब्रिटिशांचे घनघोर युद्ध झाले. यात मराठ्यांचा मोठा विजय झाला. याचे प्रतीक म्हणून खिंडीत विजय मारुतीची स्थापना केली गेली. बजरंगदल – विश्वहिंदू प्रतिवर्षी सदर  दिवस विजय दिवस म्हणून साजरा करतात. यावर्षी चौराई देवीच्या मंदिरामध्ये विजय दिवसाचा समारंभ उत्साहात पार पडला. श्री संदेश भेगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांचे ब्रिटिश मराठा युद्धावर व्याख्यान पार पडले. ते म्हणाले, “प्लासी (१७५७),   पानिपत(१७६१), बक्सार(१७६४) या युद्धांमध्ये ब्रिटिशांचा विजयच झाला. मराठे सोडता या काळामध्ये ब्रिटिशांना थोपवणारी एकही राजसत्ता भारतामध्ये नव्हती. सातत्याने विजय प्राप्त करनारी ब्रिटिश राजवट या वेळी पुणे ताब्यात् घ्यायला निघाली मात्र महादजी शिंदे, नाना फडणवीस, सरदार रास्ते, तुकोजी होळकर, भिवराव पानसे यांच्या समोर ब्रिटिशांनी गुडघे टेकले मराठी सत्तेचा मोठा विजय यावेळी झाला. पुढील काळात देशाला स्वातंत्र्य मिळवीत असताना क्रांतिकारकांनी अशाच महान योद्ध्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून क्रांतिकार्य केले आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला”

या वेळी चौराई मातेला अभिषेक घालण्यात आला. आभार प्रदर्शन , अॅडवोकेट गणेश जगताप यांनी केले.सदर कार्यक्रमास महेन्द्र असवले, सचीन शेलार, ब्रिजेश चौहान, निखिल भांगरे, भास्कर गोलिया, पुरुषोत्तम राऊत,विश्वनाथ जावलीकर, निलेश गराडे उपस्थित होते.कोविडचे सर्व नियम पाळून सदर कार्यक्रम केला गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!