आरोग्य व शिक्षण

कोविडच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना वार्षिक करातून करमाफी

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र शासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना वार्षिक करातून १००% करमाफी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

यामध्ये शाळांच्या मालकीच्या तसेच केवळ स्कूलबस म्हणून वापरात येणाऱ्या,शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी शाळे व्यतिरिक्त इतरांच्या स्कूल बसेसना १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी साधारणतः १३.१७ कोटी रुपयांची करमाफी देण्यात आली.

यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील गेल्या २ वर्षांपासून बंद असलेल्या शाळेच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या गाडी चालकांना एकप्रकारे दिलासा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!