आरोग्य व शिक्षण

देहू नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व ; 14 जागांवर विजय 

Spread the love

देहू : देहू नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 17 पैकी 14 जागांवर विजय मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले आहे .भाजपने एक जागा तर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर प्रथमच निवडणूक येथे पार पडली पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीने एकतर्फी निर्विवाद वर्चस्व देहू नगरपंचायतीवर स्थापन केले आहे.

देहूमध्ये 17 जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात होते. त्यात 14 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला. अपक्षांना दोन जागा तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाल्यावर विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून जल्लोष केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!