आरोग्य व शिक्षण

ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत शिवदे यांचे निधन

Spread the love

पुणे : ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. श्रीकांत शिवदे यांचे वयाच्या 67 व्या वर्षी दीर्घ आजाराने आज (19 जानेवारी) निधन झाले. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाने आजारी होते.पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिवदे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

अनेक प्रसिद्ध सिने कलाकारांच्या व व्यक्तीच्या केसेस चे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते. सलमान खान हिट अँड रन प्रकरण, आहुजा लैंगिक अत्याचार प्रकरण, त्याचबरोबर 2G  घोटाळ्यातील त्यागी, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित ,सुलेमान बेकरी गोळीबार प्रकरण, शीना बोरा याप्रकरणातील पीटर मुखर्जी आदींचा यात समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!