आरोग्य व शिक्षण

मावळ तालुका भाजपा किसान मोर्चाचे वतीने लाक्षणिक उपोषण

Spread the love

वडगांव मावळ : मावळ तालुका व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध कार्यकारी सोसायटी कडून घेतलेल्या कर्जाची नियमित व वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले 50 हजार रुपये प्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी,किसान मोर्चा मावळ तालुका यांचे वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण, आंदोलन गुरुवार 20 जानेवारी रोजी तहसील कार्यालय आवारात,पंचायत समिती समोर करण्यात आले.

सदर विषयासंदर्भातील निवेदन नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र किसान मोर्चा चे सचिव संतोष दाभाडे, किसान मोर्चा अध्यक्ष सुभाष धामणकर, तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, मा सभापती गुलाबराव म्हाळसकर,वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे, , राजाराम असवले, किसन सावळे, किसन येवले, हरिभाऊ दळवी, संतोष काळे, किसन अंबोले, संतोष येवले, बाळासाहेब पारखी,अमोल केदारी,बाबूलाल गराडे, गणेश भांगरे,नथुराम करवंदे,विनायक भेगडे आदीजण उपस्थित होते.

नियमित व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत सरकारने देण्याचे जाहीर केले होते परंतु सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संताप व नाराजी असून त्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड नियमित व वेळेत करून चूक तर केली नाही ना कर्जाची परत फेड करावी की नाही असे संभ्रमावस्था व मनस्थिती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे.असे मत तालुका अध्यक्ष सुभाष धामणकर यांनी व्यक्त केले.

31 मार्च 2022 पुर्वी सदर कर्ज रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खातेवर जर या सरकारने जमा झाली नाय केली तर महाराष्ट्र प्रदेश भाजप किसान मोर्चा चे अध्यक्ष वासुदेव काळे यांचे मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव संतोष दाभाडे यांनी दिला

सदर उपोषण आंदोलन महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या संदर्भातील सर्व नियम पाळून करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!