आरोग्य व शिक्षण

लोणावळा परिसर व ग्रामिण भागात थंडी वाढली ; पहाटे पावसाच्या सरी

Spread the love

लोणावळा : लोणावळा शहर व ग्रामिण परिसरात थंडीची लाट आली असून आज पहाटे ग्रामीण परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे आणखी थंडीची हुडहुडी भरली आहे.

थंडी वाढल्यामुळे मळवली , भैरवनाथनगर , लोणावळा , कुसगाव वळकाईवाडी , कार्ला परिसरात रूग्णालयात व क्लिनिकमधे रूग्णांची गर्दी वाढताना दिसते. खोकला , सर्दी , पडसे , थंडीताप , आदी आजाराने लोक रूग्णालयांमधे जात असल्याचे दिसून आले. थंडीमुळे गावोगावी तरूण , वयोवृध्द शेकोटी करून शेकतानाचे दृश्य दिसते.पहाटे माॕर्निंगवाॕकला लोक लोकरीचे कपडे घालूनच बाहेर पडतात .माञ जास्त थंडीमुळे हे प्रमाण कमी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!