आरोग्य व शिक्षण

संकटवेळी जो चांगले काम करतो त्याच्या पाठीमागे लोकांचा अर्शिवाद असतो – आमदार संतोष बांगर

Spread the love

कार्ला : संकटावेळी कुठलीही भिती मनात न ठेवता लोकांसाठी जो धावून येतो त्या व्यक्तीला लोकांचे भरभरून अर्शिवाद मिळल्याने ती व्यक्ती र्निधोकपणे समाजात काम करत राहते,कोरोना काळात डाॅक्टर ,आरोग्यसेवक,आशावर्कर यांनी अशाच पध्दतीने लोकांसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी काम केले.त्याचप्रमाणे शिवसैनिकांनीही कोरोना काळात लोकांना मोठा धीर देण्याचे काम केले त्यामुळेच लोकांचा अर्शिवादाने आपण सर्वजण या ठिकाणी कोरोना योध्दा कार्यक्रमास उपस्थित आहोत असे गौरवोद्गार हिंगोली मतदार विधानसभा संघाचे आमदार संतोष बांगर यांनी कार्ला जिल्हा परिषद आरोग्य अंतर्गत येणाय्रा डाॅक्टर,आरोग्य कर्मचारी,आशावर्कर अशा एकुण ५७ जणांना कोरोना योध्दा पुरस्कार देताना काढले.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जयंतीनिमित्त शिवसेना कार्ला शाखेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे,तालुकाप्रमुख राजेश खांडभोर,कार्ला जिल्हा परिषद आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी,डाॅ भारती पोळ,उधोजक करीमभाई,तालुका शिवसेना संघटक सुरेश गायकवाड,अंकुश देशमुख,उपतालुकाप्रमुख मदन शेडगे,युवासेना तालुका समन्वयक दत्ता केदारी,युवासेना उपतालुकाप्रमुख विजय तिकोणे ,संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संतोष गिरी,माजी सागर हुलावळे,उपसरपंच किरण हुलावळे,सावित्रीबाई फुले युवासेना कक्षाचे उपाध्यक्ष विशाल हुलावळे,वाकसईचे शाखाप्रमुख चंद्रकांत मडके,कार्ला शाखाप्रमुख ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे,सनि हुलावळे,ग्रामपंचायत सदस्या सोनाली मोरे,वत्सला हुलावळे,कै संजय उर्फ आवानाना प्रतिष्ठानचे सदस्य रमेश जाधव,सतीश मोरे,अक्षय हुलावळे,आदेश हुलावळे,तुकाराम हुलावळे,दत्तु हुलावळे,जयवंत येवले,कार्ला ग्रांमस्थ व सहायक वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशावर्कर,आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होता.

कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे यांनी केले होते.उपस्थितांचे आभार डाॅ. प्रमोद ठोंबरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!