आरोग्य व शिक्षण

प्रजासत्ताक दिनानिमित्त जनसेवा विकास समितीने केली मिठाई वाटप 

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा पुढाकार

Spread the love

तळेगाव : जगातील कोरोना महामारीचे संकट दूर होऊन चैतन्याची पहाट यावी यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त जनसेवा विकास समितीने तळेगावात मिठाईचे वाटप केले.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तळेगावातील स्टेशन चौक, वीरचक्र मंडळ चौक, यशवंतनगर, मराठा क्रांती चौक, सिंडिकेट बँक, जनसेवा वाचनालय, इंद्रायणी महाविद्यालय समोर, मनोहर नगर, बालाजी मार्बल समोर मिठाई वाटप करण्यात आली.

यावेळी बोलताना किशोर आवारे म्हणाले की,मिठाई वाटप हे केवळ निमित्त असून कोविडरुपी भस्मासुराचा वध व्हावा व पुन्हा जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी केलेली ही प्रार्थना आहे. जनसेवा विकास समितीच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले व उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!