आरोग्य व शिक्षण

स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा

Spread the love

तळेगाव : श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद स्कूल मध्ये आज बुधवार ( दि 26 जानेवारी ) रोजी भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचा प्रथम क्रमांक पटकावणारा गुणवंत माजी विद्यार्थी प्रभात पाडळकर,  डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष  संतोषजी खांडगे, उपाध्यक्ष  दादासाहेब उ-र्हे ,कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, संचालक विलास काळोखे, खजिनदार  सुदाम दाभाडे, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे ,उपाध्यक्षा जयश्री जोशी ,रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. चे प्रवीण भोसले(सचिव) , विल्सन सालेर ,योगेश शिंदे ,सचिन कोळवणकर , शंकर हदिमनी आदी मान्यवर उपस्थित होते.

संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करून भारत मातेचा जयघोष झाला .विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली .प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीताने केली.

कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे प्रभात पाडळकर याचा स्वागतपर सत्कार श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी खांडगे यांनी केला.उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार शालेय पर्यवेक्षिका रेणू शर्मा यांनी केला. शाळेच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर करून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना मानवंदना दिली.

विद्यालयातील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कार्यक्रमांमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. प्रजासत्ताक दिनावर वक्तृत्व, गीत गायन, देशभक्तीपर गीते, नाटक, कवायत, विविध नेत्यांच्या वेशभूषा द्वारे व्यक्तिमत्व परिचय, वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांद्वारे कोरोना विषयांचे नियम ,काळजी, खबरदारी, सुरक्षा याविषयी समर्पक माहिती विद्यार्थ्यांनी सादर केली.

प्रजासत्ताक दिना विषयी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रभात पाडळकर यांनी संविधानाचे महत्त्व सांगून कोरोना काळात विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून स्वतःचा विकास कसा करावा याविषयी माहिती दिली.श्री.डोळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी खांडगे यांनी आपल्या वक्तव्यातून शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहत त्यांचे बलिदान वाया न जाऊ देता आपल्या भारताला आपण महासत्ता बनवू असा संकल्प व्यक्त केला. कोरोना काळात काळजी घेऊन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य केले जाईल अशी ग्वाही देऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय पर्यवेक्षिका रेणू शर्मा ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका सौ.तेजस्विनी सरोदे यांनी केले.मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची गोड सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!