आरोग्य व शिक्षण

भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन लोणावळ्यात ध्वजारोहन व विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा

Spread the love

लोणावळा : भारताच्या ७३ वा प्रजासत्ताक दिन लोणावळ्यात शासकीय , निमशासकीय कार्यालयांसमोर ध्वजारोहन करून व विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा आला.लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्य शासकीय इमारतीसमोर मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी सोमनाथ जाधव यांचे हस्ते सकाळी सव्वा नऊ वाजताचे सुमारास ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी सहाय्यक मुख्याधिकारी भगवान खाडे ,अधिकारी शिवाजी मेमाणे , विविध समित्यांचे सभापती , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड , काँग्रेस आयचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड , भाजपचे माजी नगरसेवक ललित सिसोदिया , माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के , संजय घोणे, तसेच माजी नगरसेवक , नगरसेविका नागरिक व पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी स्वच्छ सर्वेक्षण बाबत शपथ घेण्यात आली. प्रशासकीय अधिकारी सोमनाथ जाधव यांचे हस्ते संविधान फलकाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.जाधव यावेळी म्हणाले , लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने चार वर्षे सतत स्वच्छ सर्वेक्षण मधे क्रमांक मिळवत आसून २०२१ मधे दुसरा क्रमांक मिळवून राष्ट्रपती रामनाथ कोविद यांचे हस्ते पुरस्कार मिळविला आहे. याही वर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मधे लोणावळा नगरपरिषद स्पर्धेत असून प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी सज्ज आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळावे यासाठी आपण स्वच्छता अॕप डाऊनलोड करावे. आपण केलेल्या सुचनांचा विचार करून विकास कामांमधे त्याची अंमलबजावणी केली जाईल. यावेळी लोणावळ्याचे प्रशासकीय अधिकारी सोमनाथ जाधव यांनी ध्वजारोहन व संविधान फलकाचे उद्घाटन कार्यक्रमात मास्कचा वापर न करता सहभाग घेतल्याने नागरिकांकडून याची चर्चा ऐकायला मिळाली . प्रशासकीय आधिकारीच जर मास्कचा वापर करत नसेल , तर नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवणार ? असा नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला.

लोणावळा शहर पोलिस स्टेशनला पोलिसनिरिक्षक सिताराम डुबल यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी सर्व अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. लोणावळा मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयासमोर मंडल अधिकारी बजरंग मेकाले यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी संतोष राणे ,    जाधव तलाठी , सौ.लोखंडे तलाठी , वैद्यकीय कर्मचारी सत्यवान घोलप , कोतवाल पूनम वाघमारे , सचिन घोणे, सोनाली कोळसकर, पोलिसपाटील प्रकाश हारपुडे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने माजी प्रांतिक सदस्य रमेशचंद्रजी नय्यर यांचे बंगल्याचे आवारात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी श्री.गायकवाड , राष्ट्रवादीचे प्रांतिक सदय्य बाळासाहेब पायगुडे , माजी उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रांतीकारकांनी देशासाठी बलीदान दिले त्यांची आठवण ठेवून देशासाठी कार्य करण्याचे अवाहन केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर , भरत हारपुडे , राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष , कामगारनेते दिलीप पवार , सुरेश ढमढेरे, खरेदी विक्री संघाचे संचालक दत्ता गिरिगोसावी , जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ बोराटी , पदाधिकारी हेमंत मुळे, सलीम मणियार , मुस्लिम को आॕपरेटिव्ह बँकेचे संचालक जाकीर खलीफा , पुणे जिल्हा चिञपट सेलचे सरचिटणीस किरण पाळेकर , राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष आजिंक्य कुटे, पदाधिकारी सन्नी पाळेकर , जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी सेल उपाध्यक्ष अजिंक्य टकले , सुनिल असवले ,संजय कडू, आदी मान्यवर उपस्थित होते.मुस्लिम बँकेच्या संचालक पदी निवडून आल्याबद्दल श्री.खलिफा यांचा शहराध्यक्ष व मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

लोणावळा ग्रामिण पोलिस स्टेशन व लोणावळा उपविभागीय पोलिस स्टेशन समोर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक प्रविण मोरे , लोणावळा शहरचे पोलिस निरिक्षक सिताराम डुबल तसेच अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी कोरोना योध्दा हा पुरस्कार व पुष्पगुच्छ देवून प्रेम विश्वकर्मा , अजय विश्वकर्मा , बाबू खेडकर , जयराम शिंदे , सुमन बेनके यांचा श्री.राजेंद्र पाटील , प्रविण मोरे व सिताराम दुबल या आधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

भारतीय जनता पक्षाचे वतीने नांगरगाव येथे मगनलाल चिक्की चे कंपनीच्या आवारात पक्षाचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांचे हस्ते व माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांचे उपस्थितीमधे ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक श्रीधर पुजारी , ललित सिसोदिया , देविदास कडू, माजी नगरसेविका बिंद्रा गणाञा , मंदाताई सोनवणे , उद्योजक चिमन उर्फ अशोक आगरवाल , उद्योजक मुकेश परमार , पदाधिकारी अरूण लाड, आशिश बुटाला , सुरेश गायकवाड , गिरीश मुथा आदी उपस्थित होते.

लोणावळा शहर काँग्रेस (आय ) चे वतीने गवळीवाडा येथील श्रीराम मंदिरासमोर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त ध्वजारोहण लोणावळा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोदजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कवीश्वर लोणावळा शहर सेवादलचे अध्यक्ष सुनिलजी मोगरे, श्रीराम सेवाभावी ट्रस्ट गवळी वाडाचे अध्यक्ष दिलीप लोढे , श्रीराम क्रींडा मंडळाचे अध्यक्ष महादेव गवळी, माजी नगरसेवक धीरूभाई टेलर, , सुधीर शिर्के , माजी नगरसेविका संध्याताई रवंडेलवाल ,सुर्वणाताई आकोलकर , अल्पसंख्या अध्यक्ष जकीर शेख, वकील सेलचे अध्यक्ष प्रथमेश रजपुत अंसंघटीक अध्यक्ष फकीराजी गवळी, जेष्ट पदाधिकारी जंगबहादूर बक्षी ,सुंबोध खंडेलवाल ,अनिल गवळी, मन्यारभाई शेख , जंयवत शिंदे,माजी नगरसेवक प्रविण वर्तक, श्री अशोकजी मावकर ,नाशीर शेख , रवि सलोजा, मोहनजी शिरसागर, आबासभाई शेख, मारूती राक्षे, नितीनजी नगरकर ,श्री मोहनजी शिरसागर, श्री,कीसनजी गुप्ता,सेवादलाचे भाई मजिद शेख,उल्हास भालेराव,चंद्रकांत व्हणमाने,बाळासाहेब गायकवाड, मंहमभाई शेख,सेवादलच्या ताई रेखाताई वांळके,योगीताताई सांगळे ,मंगलताई दळवी,कल्पानाताई नायर,रजीया शेख,तंनमून शेख,मुजावर ,तसेच निलमताई कडू,माधुरी सोनवणे,पूष्पाताई भोकसे,स्वाती लोंखडे,ज्योती लोंखडे उद्योजक हेमंत मिंढे, संजय गवळी,राजू गवळी,गणेश गवळी,नंदाजी कडूसकर,सूर्यकांत औरंगे,सुभाष लोंखडे,मनोज आ, गवळी,योगेश गवळी,सतिश लोंढे,प्रकाश टेलर तसेच सेवादलाचे सुनिल मोगरे आदी कॉग्रेस प्रेमी बहु संख्येने उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!