आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

हवामान बदलाचा कडधान्यांना फटका

Spread the love

कार्ला: मागील काही दिवसांपासून हवामानात होत असलेल्या सतत बदलाने ऐन बहरात आलेली कडधान्ये पिकांना मोठा फटका बसण्याची शकयता निर्माण झाली आहे.डिसेंबर मध्ये अवकाळी पाऊसामुळे काही दिवसापुर्वी कडधान्येची पेरणी झाली होती. अवकाळी पाऊस झाला तेव्हा पेरलेल्या कडधान्यांना नुकतेच कोंब उगवुन आले होते.परंतु अवकाळी पाऊसाने नुकतीच कोंब आलेली हरभरा,वटाणा,मसूर ही कडधान्ये दबली होती.त्यावेळी शेतकय्रांना चिंता लागून राहीली होती,परंतु पुढील वीस पंचवीस दिवस चांगली थंडी पडल्याने या कडधान्यांना अनुकूल हवामान निर्माण झाले होते.

त्यामुळे दबलेली पिके पुन्हा चांगली बहरली होती.फुलांचा चांगला बहर पाहून शेतकरी समाधान व्यक्त करत होते.परंतु जानेवारीच्या तिसय्रा व चवथ्या आठवड्या ढगाळ वातावरण,हलकासा अवकाळी पाऊस,चिकट अद्रता,यामुळे फुलांचा चांगला बहर आलेली हरभरा,वटाणा,मसूर ही पिके अक्षरशा जळुन गेली आहे .मागील महीनाभर कडधान्ये पिकांना अनुकूल झालेले हवामान व शेतात डौलाने उभी असलेली पिके पाहून शेतकरी समाधान व्यक्त करत असताना,आता मात्र अचानक झालेल्या हवामाना मुळे शेतातील पिकांची अवस्था पाहून,हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!