आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या अन्यथा रद्द करा ; विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन 

Spread the love

पुणे : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी एचएससी बोर्डाच्या बाहेर आज आंदोलन  केले. परीक्षा ऑफलाइन न घेता ऑनलाइन स्वरुपातच घ्यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

आमचे वर्षभर क्लास ऑनलाईन झाले आहेत. त्यात शिकवण्यात आलेला अभ्यासक्रम आम्हाला समजला नाही. तसेच अभ्यासक्रम अजून अपूर्ण आहे. पूर्ण झालेला नाही. तरी विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची कशी ? असा संतप्त सवाल यावेळी विद्यार्थ्यांनी केला.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा आणि महाविद्यालय ऑनलाईन सुरू आहेत. यातच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले. दहावीची परीक्षा 15 मार्च तर बारावीची परीक्षा 4 मार्च पासून ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले. या निर्णयाविरुद्ध पुण्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!