ताज्या घडामोडी

महादेवनगर येथील रस्ते,आरोग्य व पाणीपुरवठा या प्रमुख मागण्यासाठी पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

ज्या ठेकेदाराने कामे रखडलेली आहेत त्यांना काळ्या यादीत टाकणार-मुख्याधिकारी वैभव साबळे यांचे आश्वासन….या उपोषणाची दखल घेत मुख्याधिकारी तथा प्रशासक इस्लामपूर नागरपालिका यांनी त्यांच्या दालनात बैठकीस बोलावून मूलभुत सुविधा व त्या रस्त्याच्या मागण्यांसाठी महाडिक युवाशक्तीच्या सर्व पदाधिकारी व महादेवनगर मधील नागरिकांशी चर्चा केली, महादेवनगर मधील मंडले कॉलनी,निनाई नगर,स्टेट बँक कॉलनी,दत्त कॉलनी, चरापले बझार नजीकचे रस्ते पुढील १ महिन्याच्या आत पुर्ण करून घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.तसेच जे रस्ते निकृष्ठ झाले आहेत,ते परत दुरुस्त करून मगच वरचे थर पूर्ण करून घ्यावे, अन्यथा या ठेकेदाराना काळ्या यादीत टाकले जाईल असे सांगण्यात आहे.
अशुद्ध पाण्यासंदर्भात ही जी पूर्वी पार चालत आलेली पद्धत म्हणजे तुरटी घालून पाणी शुद्ध करणे, ती बदलून त्याच क्षमतेची पावडर वापरून पाणी शुद्ध करण्याचा प्रयोग लवकच करणार असल्याने पाण्याचा ही प्रश्न सुटेल व नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल असे सांगितले.यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यावर बोलताना सुजित थोरात म्हणाले, ज्या मागण्या आम्ही मुख्याधिकाऱ्याकडे केल्या त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात,नागरिकांचा अंत पाहू नये, जर प्रशासक काम करून घेण्यात अपयशी ठरले तर जिल्हाधिकाऱ्यांना न्याय मागू.
यावेळी जेष्ठ नागरिक ज्ञानदेव पाटील, धीरज कबुरे, संकेत भंडारे, ऋषिकेश पाटणकर,अभिषेक शिंदे,मयूर शेजाळे,प्रथमेश निकम,सतीश गायकवाड,सुदाम चव्हाण,जीवन झेंडे,युवराज मोहिते,रत्नदीप करे,अनिल खटावकर,शुभम जाधव आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!