आरोग्य व शिक्षण

महिला भगिनींच्या डोक्‍यावरील हंडा उतरवण्यासाठी जल जीवन मिशन तारक ठरेल – सारिका शेळके

Spread the love

वडगाव : मावळ तालुक्यातील महिला भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी जल जीवन मिशन तारक ठरेल असा विश्वास कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापिका सारिका शेळके यांनी व्यक्त केला.

आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कान्हे येथील जल जीवन मिशन योजने अंतर्गत 4 कोटी 92 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. या योजनेचा भूमिपूजन समारंभ स्थानिक मान्यवरांच्या व महिला भगिनींच्या शुभहस्ते संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.

या भूमिपूजन समारंभ प्रसंगी पीएमआरडीए सदस्या दिपाली हुलावळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, कुलस्वामिनी महिला मंच संस्थापिका सारिका शेळके, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष नारायण ठाकर, सदस्य अजिंक्य टिळे, सरपंच विजय सातकर, माजी सरपंच संतोष जांभुळकर, उपसरपंच रुपाली कुटे, माजी उपसरपंच प्रकाश आगळमे, राष्ट्रवादी काँ.सरचिटणीस शशिकला सातकर,आदिका तनपुरे, राष्ट्रवादी काँ.खडकाळा गण महिला अध्यक्ष रंजनाताई सातकर, राष्ट्रवादी महिला कान्हे अध्यक्ष उषाताई सातकर, वैशालीताई सातकर, ग्रामपंचायत सदस्य गिरीश सातकर, किशोर सातकर, महेश सातकर, बाबाजी चोपडे, अश्विनी शिंदे, आरिफ मुलाणी,संदीप ओव्हाळ, सोपान धिंदळे,आशाताई सातकर, मनीषाताई ओव्हाळ,सुनिताताई चोपडे,सुजाताताई चोपडे, रोहिणीताई चोपडे, सोनालीताई सातकर, उद्योजक नारायण मालपोटे,कल्पेश मराठे, मुख्याध्यापिका शोभा वहिले, ग्रामविकास अधिकारी संतोष शिंदे, किसन सातकर, दशरथ सातकर, बाळकृष्ण टपाले, किशोर पंढरीनाथ सातकर, विजय शेडगे,प्रतीक सातकर आदि मान्यवर, महिला भगिनी, आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!