आरोग्य व शिक्षण

लोणावळ्यात माघी श्री गणेश जयंतीनिमित्त श्री रायवूड गणेश मंडळाचे मंदिरात महिलांसाठी हळदी कुंकू

Spread the love

लोणावळा : लोणावळ्यात माघी श्री गणेश जयंतीनिमित्त श्री रायवूड गणेश मंडळाचे मंदिरात , अंबरवाडी तील श्री सिध्दीविनायक गणेश मंदिरात ,गवळीवाडा , भांगरवाडी येथे तसेच भैरवनाथनगर येथे संकल्पपूर्ती गणेश मंदिरात आज दर्शनासाठी गर्दी होती. श्री रायवूड गणेश मंडळाचे प्रांगणात पंचक्रोशितील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन आमदार सुनिलआण्णा शेळके युवा मंचचे पदाधिकारी धनंजय वसंतराव काळोखे यांचेवतीने करण्यात आले होते.

प्रमुख उपस्थितीमधे आमदार यांचे पत्नी सारीकाताई सुनिलआण्णा शेळके यांचे उपस्थितीतीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रस्तुतकर्ता सह्याद्री वाहिनी निवेदिका कु.पूजा थिगळे यांनी उत्कृष्ट संयोजन केले. यावेळी श्री रायवूड गणेश मंडळ मुख्य विश्वस्त माजी उपनगराध्यक्ष विलासभाऊ बडेकर , जेष्ट कार्यकर्ते वसंतराव काळोखे , नरेश खोंडगे, आयोजक धनंजय काळोखे , तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रथम क्रमांकास फ्रीज , दुसऱ्या क्रमांकाला एल ई डी टी व्ही , तिसऱ्या क्रमांकाला वाॕशिंग मशीन आदी ५ बक्षिसे व मानाच्या पैठणी पटकावण्यासाठी सुमारे आठशे नवशे महिलांनी हजेरी लावली होती. खेळाआधी सर्व महिलांनी दर्शनाचा रांगा लावून लाभ घेतला. अंबरवाडी येथे कोविड चे नियमांकडे लक्ष देत साधेपणाने  उत्साहात गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला .

भांगरवाडी येथे श्री गणेश लक्ष्मीनारायण मंदिरात गणेश जन्माचे दिवशी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली होती.गवळीवाडा येथील श्रीराम मंदिरातही आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली होती. , लालटाकी येथील श्री रायवूड गणेश मंदिरात गणेश जन्म , पाळणा, सुंटवडा वाटप कार्यक्रम झाला.सत्यनारायण पूजा झाली. येथे जेष्ट किर्तनकार ह.भ.प.धर्मराज महाराज हांडे ,वारजे ,पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.भैरवनाथनगर येथे नवमी भजनी मंडळाचा हरिपाठ झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!