आरोग्य व शिक्षण

कार्ला विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी एकनाथ गायकवाड बिनविरोध 

Spread the love

कार्ला : कार्ला विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पदी वेहेरगाव येथील एकनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोसायटीचे अध्यक्ष विलास कुटे यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. यासाठी गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, मावळ तालुका सचिव संघटना अध्यक्ष गणपत भानुसघरे, शिवसेना मावळ संघटक सुरेश गायकवाड, सोसायटीचे उपाध्यक्ष ताराबाई हुलावळे, कार्ला उपसरपंच व संचालक किरण नलावडे, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन व संचालक भाऊसाहेब मावकर,माजी चेअरमन विठ्ठल हुलावळे, प्रसाद हुलावळे, संगीता भानुसघरे, संचालक शिवाजी कोंडभर, किसन अहिरे, शिवराम धुमाळ, राम भानुसघरे, तज्ञ संचालक नितीन वाडेकर, शत्रुघ्न देवकर, पांडुरंग भानुसघरे ,राजू देवकर ,संदीप देवकर, संतोष गायकवाड, सागर जाधव ,अनंता हुलावळे, अनिल गायकवाड, शेखर गायकवाड, प्रवीण गायकवाड, अजय देवकर, अनिल देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!