आरोग्य व शिक्षण

चैतन्य इंटरनॅशनल स्कूल(CBSE) इंदोरी येथे दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन आणि चर्चासत्राचे आयोजन

Spread the love

इंदोरी : चैतन्य चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये बुधवार ( दि. १६ फेब्रुवारी) रोजी दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी खास मार्गदर्शन आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इंद्रायणी इंग्लिश मिडीयम स्कूलचे क्रीडा शिक्षक व संघर्ष करिअर अकॅडमी चे संस्थापक श्री.विशाल विनोद मोरे सर पालक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाचा मुख्य विषय ‘इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना’ हा होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख वक्ते श्री. विशाल मोरे सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना काय काळजी घ्यावी? आणि कोणती खबरदारी घ्यावी? विद्यार्थ्यांनी यश संपादन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रश्नांच्या माध्यमातून त्यांचे अभ्यासाबाबत विचार जाणून घेतले .त्याचबरोबर आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी अभ्यास करणे महत्त्वाचे आहे .स्मरण शक्ती वाढवता आली पाहिजे. त्याचबरोबर परीक्षेसाठी तयारी कशी करावी? त्यासाठी आवश्यक गोष्टी सांगितल्या.

सकारात्मक विचार व मन लावून अभ्यास करा, प्रश्नपत्रिकेचा सराव करा पाठांतर न करता समजून प्रश्नांची उत्तरे लिहा.अभ्यासाचे नियोजन करताना वेळापत्रक आणि स्मार्ट फॉर्मुला विद्यार्थ्यांना समजावून सांगितला .त्यामध्ये विशिष्ट ध्येय, प्रमाणित नियोजनबद्ध कृती ,वस्तुस्थितीचे भान असणे, एकाच विषयाचा अभ्यास न करता सर्व विषयाचा अभ्यास करणे ,अभ्यासासाठी वेळापत्रक तयार करणे इत्यादी गोष्टी समजावून सांगितल्या. स्पर्धा टाळा .स्वतः वर लक्ष केंद्रित करा. शिक्षका बरोबर चर्चा करा. व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ध्यानसाधना व पोषक आहार घ्या.जिद्दीने अभ्यास करा. चांगला माणूस बना. घरातील संस्कार, पालकांचे अनुकरण, आदर्श पालक यातूनच पाल्य घडत असतो .त्यानंतर त्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर शाळेचे संस्थापक चेअरमन यांनी विद्यार्थ्यांना दिवास्वप्न न पाहता स्वप्न सत्यात साकार करावे .विद्यार्थ्यांनी ज्ञान अर्जित करीत रहावे. जिद्द अंगी बाळगावी .’जिद्द निर्माण करणारी शिक्षणपद्धती असावी.आई-वडिलांचे नाव उज्वल करावे .उज्वल भवितव्य घडवावे.’ असा मोलाचा संदेश दिला व उपस्थित पाहुण्यांचे व पालकांचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक वर्गाने उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद दिला . कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले . कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् म्हणून झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!