आरोग्य व शिक्षण

रोटरी क्लब आॕफ तळेगाव MIDC ची अॕन्स मिटिंग राजमाची येथील किल्ल्यावर संपन्न

Spread the love

राजमाची : रविवार (दि.१३ फेब्रुवारी) रोजी रोटरी क्लब आॕफ तळेगाव MIDC ची या महिन्याची अॕन्स मिटिंग मावळ तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या राजमाची येथील किल्ले मनरंजन व किल्ले श्रीवर्धन या ठिकाणी झाली . यामध्ये जवळजवळ ६० अॕन्स ,अॕनेट व मेंबर उपस्थित होते .

सकाळी सकाळी दोन्ही किल्यांवर चढाई करून सर्वांनी ट्रेकचा आनंद घेतला. सांगाती सह्याद्री ग्रुपचे इतिहासतज्ञ श्री .गोकुळ लोंढे सर व श्री .सचिन ढोबळे सर यांनी दोन्ही किल्यांची खडानखडा माहिती दिली .त्यानंतर खाली आल्यावर उदयसागर तलाव व इतिहासकालीन महादेव मंदिर पाहिले .या ठिकाणी अतिशय प्रसन्न व शांत वाटले. राजमाची गावात बाहेरून दिसायला अगदी साधेसुधे पण आतून बंगल्याचा फिल येणारी घरे पाहिली . त्यानंतर गो.नी.दांडेकरांच्या सोबत चाळीस वर्षे राहिलेल्या यांच्या घरी मध्यान्ह भोजनाचा बेत केला होता

.यामध्ये क्लबच्या अध्यक्षा रो.सुमती निलवे व रो.मिलिंद शेलार सर या दोघांनी अतिशय छान नियोजन करून सर्वांना मावळी ग्रामीण सुग्रास जेवणाचा आनंद दिला . यामध्ये क्लब डायरेक्टर्स ,रो.मेंबर्स, अॕन्स व अॕनेट यांनी खूपच आनंद घेतला.

या प्रोजेक्टसाठी संस्थापक अध्यक्ष रो.संतोषजी खांडगे, माजी सेक्रेटरी रो.सचिन कोळवणकर, उपाध्यक्ष रो.विल्सन सालेर, सेक्रेटरी रो.प्रविण भोसले, रो.पांडुरंग पोटे, रो.मिलिंद शेलार , रो. गणेश भेगडे, रो.हादिमणी, रो.बोञे ,रो.घोजगे ,रो.मकर सर अॕन. उमेश नवघणे या सर्वांनी व सांगाती सह्याद्री शिक्षक ग्रुपच्या सदस्यांनी खूपच छान नियोजन करून ही अॕन्स मिटिंग राजमाची या ठिकाणी घडवून आणली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!