आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

सांघिक प्रयत्नातून यश प्राप्त करता येते – प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे

Spread the love

चिंचवड :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत व पुणे जिल्हा क्रिडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर विभागीय खो-खो स्पर्धा (मुली) चिंचवड येथील श्री शिवाजी उदय मंडळाच्या मैदानात संपन्न झाल्या. त्यात प्रथम क्रमांक पुणे जिल्हा ग्रामीण संघाने तर, उपविजेत्याच्या मान पुणे शहर यांनी पटकाविला. कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यापीठाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजने केले.

स्पर्धेचे उद्घाटन श्रीफळ वाढवून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे व डी.वाय. पाटील स्कूलच्या प्राचार्या डॉ. मृदुला महाजन यांनी केले. निरीक्षक म्हणून डॉ. शैलेश आपटे आदी निवड समिती उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचा सत्कार पुष्पगुच्छ देवून करण्यात आला.

उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. सांगळे पुढे म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण, कला, क्रिडा क्षेत्र कोणतेही असो. विद्यार्थी व खेळाडूंनी जिद्द, चिकाटी, नेतृत्व, क्षमता व प्रयत्नाची कास अंगिकारली तर, कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आज येथे प्रत्येक खेळाडूला चमक दाखविण्याची संधी आहे. येथून पुढे किती लांबचा पल्ला गाठायचा हे तुमचे तुम्हीच ठरवा. आज च्या खेळाडूमधून उद्या विद्यापीठ स्तरावर खेळण्यासाठी 12 जणांचा संघ निवडणार आहे. सांघिक प्रयत्नातून कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे दाखवून देण्याची वेळ आज आपल्यावर आहे. याची जाणीव ठेवूनच उत्कृष्ठ खेळ सादर करावा.
प्राचार्या डॉ. मृदुला महाजन म्हणाल्या, खो-खो या ‘मातीतील देशी खेळ’ मुलींच्या क्रिडा आज स्पर्धेला उपस्थित आहे. याचा मला आनंद व अभिमान वाटत आहे. तुम्ही 21 व्या शतकातील नारी आहात. तुमच्या वडीलांचे मन मोठे आहे. तुम्ही खेळाडू म्हणून आज सहभागी झालात. प्रत्येक खेळाडूंनी स्वतःच्या खेळ सुधारावा यासाठी संशोधन करा, स्वतःवर विश्वास ठेवा व क्रिडा क्षेत्रात चमक दाखवून स्वतःचे अस्तित्व निर्माण करा.

विद्यापीठाचे निरीक्षक डॉ.शैलेश आपटे म्हणाले, चांगल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून निवड समितीसमोर आव्हान निर्माण करावे, असे आवाहन स्पर्धेतील सर्व खेळाडूंना केले.

प्रतिभा महाविद्यालयांचे मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या हस्ते विजेत्यांना संघाच्या संघनायकाला व अष्टपैलु खेळाडूंना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण संचालक डॉ. आनंद लुंकड यांनी तर आभार पी.टी. इंगळे यांनी मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!