आरोग्य व शिक्षण

कर्नाटकातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येच्या निषेधार्थ बजरंग दलाचा मावळात मोर्चा

तहसीलदारांना देण्यात आले निवेदन

Spread the love

मावळ : कर्नाटकातील प्रकरणावरून सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणून हर्ष या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून देशभरातील प्रत्येक तहसील वर निवेदन देण्यात आले. मावळ तालुक्यातही यासंदर्भात निषेध मोर्चा काढण्यात आला.

बजरंग दलच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पोटोबा महाराज देवस्थाना पासून ते तहसील कार्यालय पर्यंत घोषणा देत मोर्चा काढला व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये अपराध्यांना योग्य शासन द्यावं अन्यथा बजरंग दल याला उत्तर द्यायला समर्थ आहे अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना प्रा बाळासाहेब खांडभोर यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत अपराध्यांना फाशीची शिक्षा द्यावी .अन्यथा बजरंग दल स्टाईल्नं घरातून ओढून बजरंगदल शासन करेल असे सांगितले.

बजरंग दल चे संदेश हेगडे यांनी या विकृत मानसिकतेवर सडकून टीका करत हिंदूंनी एकत्र येण्याचे आव्हान केलं. सोमनाथ दाभाडे, गोपीचंद्र कचरे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.

हर्षा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला सामूहिक श्रद्धांजली देत मोर्चा चा समारोप करण्यात आला.

या मोर्चात विभाग संयोजक संदेश भेगडे, अमित भेगडे, बाळासाहेब खांडभोर, अमोल पगडे, मोरेश्वर पोपळे ,आकाश वारुळे , महेंद्र असवले ,धनंजय टिळे ,गोपीचंद कचरे ,प्रशांत भेगडे, विनायक भेगडे, पवन भंडारी, प्रवीण फाकटकर, अंकेश ढोरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!