ताज्या घडामोडी

लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाला राज्य रक्तदान गौरव सन्मान पुरस्कार

Spread the love

मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे रक्तदानाच्या पवित्र कार्यात गेले अनेक वर्ष आपले योगदान देत आहे.त्या कार्याचीच एक कौतुकाची थाप महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या विद्यमाने मंडळाला मिळाली आणी *राज्य रक्तदाता गौरव सन्मान २०२२* हा मानाचा पुरस्कार देऊन लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सन्मानित केले.
जागतिक रक्तदाता दिनाचे मंगलमय औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते मंडळाचे उपाध्यक्ष सागर गुप्ता व कार्यकारिणी सदस्य निलेश महामुणकर यांनी मंडळाच्या वतीने हा सन्मान स्विकारला.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ.राजेंद्र शिंगणे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेंद्र यड्रावकर,आरोग्य विभागाचे अपर मुख्य आयुक्त डाॅ. प्रदीप व्यास, आयुक्त डाॅ. रामास्वामी, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डाॅ.अरूण थोरात, डाॅ. श्रीमती साधना तायडे आदी मान्यवर उपस्थित पस्थित होते.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली ८९ वर्षे रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या वचनाचा अवलंब करून वेळोवेळी रक्दान शिबीरे आयोजित करत असते. मंडळाने ६ ऑगस्ट २०१७ साली सलग अठरा तास महारक्तदान शिबिर आयोजित करून एकूण १५ २४६ रक्तपिशव्या जमविल्या होत्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विविध ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक हाॅस्पिटलस् तथा रक्तपेढ्यांना रक्तपिशव्या पुरविल्या होत्या. जम्मू काश्मीरमधील आर्मी हाॅस्पिटलसाठी रक्तपिशव्या मंडळाच्या माध्यमातून पोहोचविल्या आहेत. दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोना पहिल्या लाटेच्या सुरूवातीस २३ मार्च २०२० ते १ एप्रिल २०२० असे सलग दहा दिवस मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित करून एकूण १५०० रक्तपिशव्या मुंबईतील विविध हाॅस्पिटलस् ना पुरवठा केला.२०२० सालातील गणेशोत्सव साजरा न करता मंडळाने गणेशोत्सवाचे सलग दहा दिवस रक्तदान शिबीर घेऊन आरोग्योत्सव साजरा केला आणि एकूण १२००० रक्तपिशव्या जमविल्या.या रक्तदान शिबिरात एकूण ४० रक्तपेढ्यांनी आपला सहभाग नोंदविला.मंडळाने गेल्या तीन वर्षात नौदल हाॅस्पिटल साठी त्रैमासिक रक्तदान शिबीर घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!