क्राईम न्युज

मेंढपाळांच्या वर प्राणघातक हल्ला

Spread the love

काल आरग मध्ये शिरोळ तालुका तसेच कर्नाटक भागातील काही मेंढपाळ आपल्या मेंढया चारण्यासाठी घेऊन जात होते. काल रात्री शेतामध्ये वस्तीस राहिले होते. याच रात्री दोनच्या सुमारास 15 ते 20 चोर मेंढ्या चोरण्याच्या उद्देशाने कळपात घुसले व मेंढ्या चोरण्याचा प्रयत्न करू लागले. इतक्यात काही मेंढपाळांना जाग आली. पण तेवढ्यात चोरट्यांनी मेंढपाळांच्या वर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये काही मेंढपाळ जखमी झाले. *सिद्धू राघू आरगे रा. हेरवाड* यांच्या हाताला जबर मार बसला. इतर मेंढपाळांना ही मार बसला. तसेच मेंढ्या सैरभैर पळू लागल्या त्यामुळे बाकीच्या मेंडके यांनी त्या मेंढ्या अडवण्याचा प्रयत्न चालू केला. यांचा फायदा घेऊन चोरट्यांनी *एक मोठा बकरा व 10 मेंढ्या चोरून पसार झाले.* मेंढपाळांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण पंधरा ते वीस चोरटी असल्यामुळे व मेंढ्या सैरभैर पळत आल्यामुळे मेंढपाळांना जास्त प्रतिकार करता आला नाही. शेवटी चोरटे तिथून पसार झाली. ही घटना आज सकाळी येथील लोकांना कळाली लगेचच इथले सामाजिक कार्यकर्ते त्या मेंढपाळांची भेट घेतली. *सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या रानात मेंढ्या बसायला होत्या त्या शेतकऱ्यानी मेंढपाळांना दवाखान्यात घेऊन त्यांच्यावर उपचार केले. तसेच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला या घटनेची तक्रार करण्यासाठी घेऊन आले.* आरग मधील लोकांनी या घटनेची माहिती फोनवरून मला दिली मी आमचे सहकारी ताबडतोब मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला हजर झालो मेंढपाळांना भेटून घटनेची माहिती घेतली त्याचबरोबर मिरज ग्रामीणचे पोलिस *निरीक्षक बेदरे साहेब* यांची भेट घेऊन या घटनेची ताबडतोब दखल घेऊन घटनेचा पंचनामा करून ताबडतोब त्या चोरांचा पर्दाफाश करून त्यांना अटक करावी करावा ही विनंती केली. मिरज ग्रामीण चे पीआय साहेब यांनी ताबडतोब ॲक्शन घेऊन आरग येथे घटनास्थळी भेट दिली व घटनेची पूर्ण पंचनामा करून त्यांची तक्रार नोंद केली. या घटनेची दखल घेऊन चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याचा विश्वास दाखवला.
या घटनेमुळे मेंढपाळांच्या प्रचंड असे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या गस्ती वाढवाव्यात अशी विनंती तिथे उपस्थित असणारे *सामाजिक कार्यकर्ते दीपक कुरबु* यांनी पोलिसांना केली. तसेच मेंढपाळांना ही कोणतीही अडचण असल्यास संपर्क करण्याची विनंती केली.
कालच्या या हल्ल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. *अखेर मेंढपाळांना कोण वाली आहे का नाही.* अनेक धनगर नेते आपआपल्या पक्षाचा अजेंडा राबवत आहेत. जरा आपला पक्ष बाजूला ठेऊन मेंढपाळांच्या कडे लक्ष्य द्या. आणि तुम्हाला जमात नसेल तर तसे सांगा आम्ही समर्थ आहोत आमची सुरक्षा करण्यासाठी.
*मेंढपाळ व्यवसाय न करणाऱ्या लोकांनी ही यांच्या कडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे. प्रत्येक समाज आपल्यां अस्मितेसाठी लढत आहे. पण आपण कुठे आहोत यांचा विचार करा. सोशल मीडियावर राजकारणासाठी एकमेकांवर कॉमेंट टाकणाऱ्या नो जरा आपल्यां मेंढपाळांच्या साठी तर मैदानात उतारा. कळू दे जगाला की हा मेंढपाळ एकटा नाही. कळू दे राज्यकर्त्यांना की आत्ता मेंढपाळांच्या साठी काही तरी केलं पाहिजे. जर खरंच काय तर करायचं असेल आणि मेंढपाळां वरच्या या हल्ल्यामुळे जर आपलं रक्त नाही उसळत तर खरंच आपण धनगर म्हणून जगण्याच्या लायकीचे नाही आहोत.
उठा जागे व्हा. आणि संघर्षांची तयारी ठेवा. कारण आपल्यां मेंढपाळांच्या रक्षणासाठी आपणच मैदानात उतरले पाहिजे. आणि तेही ताकदीनं मेंढपाळांनो आपल्या कुराडीचा वापर झाडे तोडण्यासाठी नाही तर चोरांची मुंडकी तोडण्यासाठी करा. ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!