आरोग्य व शिक्षण

कार्ला येथे शिवशंकर मंडळाच्या वतिने गुणवंताचा गुणगौरव

Spread the love

कार्ला : येथील श्री शिवशंकर तरूण मंडळाच्या वतीने कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता कनिष्ठ महाविद्यालयातील अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांंचा सन्मान चिन्ह व सतीश मोरे यांच्याकडून शालेय उपयोगी साहीत्य देऊन गौरव करण्यात आला.या शिष्यवृत्ती विधार्थ्यांना घडविणारे या विधालयातील शिक्षक उमेश इंगुळकर व विधालयाचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

तसेच तरूण हा समाजाचा पाठीचा कणा आहे. समाजात चांगले तरूण घडावे व तरूणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गेल्या वर्षा पासून मंडळाच्या वतीने
मंडळाचे सदस्य कै गणेश विश्वनाथ हुलावळे यांचा स्मरणार्थ “आदर्श युवक”पुरस्कार देण्यात येतो, यावर्षी हा पुरस्कार कार्ला येथील शेतकरी कुटुंबातील तरूण व्यक्तिमत्व आदर्श शिक्षक व पत्रकार श्री संजय राम हुलावळे यांना “आदर्श युवक” हा पुरस्कार देण्यात आला.अतिशय उत्साही वातावरणात हा गौरव सोहळा संपन्न होताना,शिवव्याख्याते दिपक पवार यांनी छत्रपती शिवाजी राजांचा जीवंत इतिहास विधार्थ्याचा व उपस्थित मान्यवरांचा पुढे उभा केला.

या कार्यक्रमास पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे,शिवव्याख्येते दिपक पवार माजी सरपंच सागर हुलावळे, ग्रामपंचयात सदस्य सचिन हुलावळे, सदस्या वत्सला हुलावळे,सोनाली मोरे,पोलिस पाटील संजय जाधव,शिवशंकर तरुण मंडळाचे संस्थापक भाऊसाहेब हुलावळे, विधापीठ युवासेनेचे उपाध्यक्ष विशाल हुलावळे, मंडळाचे अध्यक्ष संभाजी हुलावळे, उपाध्यक्ष राजु हुलावळे, खजिनदार रोहिदास शिर्के,जेष्ठ नागरिक सदाशिव हुलावळे,दत्तात्रय जाधव,विजय जाधव, संतोष हुलावळे,सतीश मोरे,अॕड सुनिल पटेकर,अॕड सचिन डिंबळे,दिनेश जाधव,सुनिल सावळे,यांच्यासह कार्ला ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळी विशाल हुलावळे यांचा हस्ते रूद्र अभिषेक करण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शिवशंकर तरूण मंडळ व सागर हुलावळे,मंगेश हुलावळे,विशाल जमदाडे,बाबाजी सोंडेकर,सुनिल सावळे,रमेश इंगोले,दिनेश जाधव,विजय जाधव,काशिनाथ फाटक,सदाशिव हुलावळे,संजय हुलावळे,या ग्रांमस्थांच्या सहकार्यातुन फराळ वाटप करण्यात आले.

तसेच ताजे येथील बाल भजनी मंडळाच्या हरीजागराने भक्तीमय व भावमय वातावरण अनुभवास मिळाले.
कार्यक्रमाचे संयोजन,मंडळाचे सल्लागार,माजी ग्रामपंचयात सदस्य भाऊसाहेब हुलावळे,मंडळाचे अध्यक्ष संभाजी हुलावळे,उपाध्यक्ष राजु हुलावळे ,खजिनदार रोहिदास शिर्के,सदस्य दिलीप हुलावळे,कैलास हुलावळे,मंगेश हुलावळे,मितेश हुलावळे, कुमार हुलावळे,विशाल हुलावळे,अनिल हुलावळे,गणेश हुलावळे,विशाल हुलावळे,निलेश शिर्के, विनोद हुलावळे ,रविंद्र केदारी,संजय हुलावळे,सचिन हुलावळे,संदिप हुलावळे,माऊली हुलावळे, यांच्यासह मंडळाचे अन्य सदस्य यांनी केले होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे तर आभार कुमार हुलावळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!