ताज्या घडामोडी

संजय खरात राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानीत.

Spread the love

कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्यातर्फे कामोठे, मुंबई येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात ‘घरोघरी शाळा’ उपक्रमाचे प्रणेते श्री. संजय खरात यांना झी मीडियाच्या सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका श्रीम. अनुपमा खानविलकर यांच्या शुभहस्ते गोल्ड मेडल , सन्मानचिन्ह व सन्मानपत्र तसेच जगण्याचा मार्ग व ज्ञान गंगा ही पुस्तके देवून सन्मानीत करण्यात आले.
पनवेल महानगरपालिकेच्या महापौर मा. डॉ. कविता चोतमल, धुळे जि. प. अध्यक्ष मा. डॉ. तुषारराव रंधे, मा. शिक्षण उपसंचालक महाराष्ट्र राज्य मा. सुरेश माळी , अभिनेत्री श्रीम.संजना पाटील, मुंबईच्या पोलीस इन्स्पेक्टर श्रीम. रत्ना खंडेलवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

सदर पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून 630 प्रस्ताव कलासाधाना सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्याकडे प्राप्त झाले होते. संस्थेच्या अध्यक्षा सौ. मेघाजी महाजन आणि संस्थेचे उपाध्यक्ष श्रीरामजी महाजन सर यांनी संजय खरात ता. माण जि. सातारा यांची सदर पुरस्कारासाठी निवड केली.संजय खरात यांनी आजपर्यंत केलेल्या विविध सामाजिक कार्याची तसेच कोरोना काळात ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमद्वारे केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कामाची दखल घेवून त्यांना सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!