आरोग्य व शिक्षण

वडगावमध्ये चार दिवस शिवछत्रपती जयंती महोत्सवाचे आयोजन

Spread the love

वडगाव : वडगाव शहरात शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी ( दि .18 ) ते सोमवार (दि. 21) या कालावधीत राजे शिवछत्रपती जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात विविध मैदानी खेळ, महिलांसाठी कार्यक्रम, कीर्तन, विविध स्पर्धा तसेच पुरस्कार वितरण सोहळा अशा उपक्रमांचे आयोजन केले आहे अशी माहिती समितीचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर व अध्यक्ष शेखर वहिले यांनी दिली.

समितीचे अध्यक्ष शेखर वहिले, कार्याध्यक्ष गोपाल ढोरे, कार्यक्रम प्रमुख राजेंद्र म्हाळसकर, श्रीधर चव्हाण, उपाध्यक्ष प्रशांत चव्हाण, संतोष भालेरा,व मदन भिलारे, सचिव आकाश वारुळे, खजिनदार योगेश म्हाळसकर, विराज हिंगे, अतुल म्हाळसकर, सरचिटणीस शरद मोरे, हरीश दानवे,ओंकार शिंदे, प्रसिद्धीप्रमुख कल्पेश भोंडवे, सुनील कुडे, केदार भवरे आदी कार्यक्रमाचे संयोजक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!