आरोग्य व शिक्षण

पोलीस पाटी लावून टुरिस्ट वाहन जोमात ; परिवहन कायदे मात्र कोमात

Spread the love

आवाज न्युज : परिवहन विभागाच्या उदासीनतेमुळे वाहनांवर विविध पाट्या, सिम्बॉल,फॅन्सी नंबर लावण्याचे प्रमाण वाढत आहे.

पोलिसांनी खासगी वाहनांवर ‘पोलीस’ लिहिण्यावर बंदी असतानाही अनेक पोलिस कर्मचारी आपल्या खासगी दुचाकी किंवा चारचाकीवर पोलिस असे लिहितात. त्याचाच फायदा घेत अनेक जण अशा पाट्या आपल्या वाहनांवर लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पोलीस अशी पाटी लावलेल्या एका गाडीवर वकिलाचा ही सिम्बॉल दिसून आला. एवढेच नाही तर सदर गाडीची नंबर प्लेट पिवळ्या रंगाची असून त्यावर ऑल इंडिया परमिट असेही नमूद केले होते. खासगी वाहनावर पाट्या लावण्यास बंदी असताना टुरिस्ट गाड्यांवर अशा पकारे पाट्या लावून राजरोसपणे संचार केला जात आहे.टोल वाचविण्यासाठी वाहन चालक आणि वाहनांवर होणाऱ्या कारवाईपासून वाचण्यासाठी अनेक प्रकारच्या पाट्यांचा आधार घेत पोलीस, वकील, प्रेस, विशेष कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस पाटील अशा पाट्या नियमांचे उल्लंघन करून वाहनांवर लावल्याचे अनेकदा दिसून येते.

यावर कारवाई तर दूरच पण वाहनांवर लावलेली पाटी आणि वाहनात असलेली व्यक्ती यांची सत्यताही तपासली जात नाही. त्यामुळे अशा पाट्यांचा वापर वाढला आहे. काळ्या काचांसाठी सामान्य नागरिकांवर कारवाई करणारे वाहतूक कर्मचारी काही वाहनांना अभय देत असल्याचे चित्र नेहमीच दिसते. फक्त नियम व कायदे करणाऱ्या परिवहन विभागाच्या उदासीनतेमुळे वाहन कायदे रोजच पायदळी तुडवले जात आहे.

एकूणच वाहनांना लावलेल्या पाट्या आणि त्याचा होत असलेला दुरुपयोग गांभीर्याने घेतला जाणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!