आरोग्य व शिक्षण

मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी अबोली मयुर ढोरे यांची सर्वानुमते निवड जाहीर

Spread the love

वडगाव : मोरया महिला प्रतिष्ठानच्या नवनियुक्त पदग्रहण कार्यकारिणी समारंभात अबोली मयुर ढोरे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.

गेल्या पाच वर्षापूर्वी मोरया महिला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी शहरातील महिला भगिनींना व्यासपीठ उपलब्ध व्हावे. तसेच वडगाव शहरामधील सर्वसामान्य महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी शहरात सात ते आठ महिला सदस्यांना सहभागी करून घेत मोरया महिला प्रतिष्ठान या सामाजिक सेवाभावी संस्थेची स्थापना केली.

आज याच मोरया महिला प्रतिष्ठानच्या बावीस संचालिका, एकशे चाळीस सभासद आणि बचत गटांच्या माध्यमातून तीनशे त्र्याहत्तर महिला सदस्या कार्यरत असून या छोट्याशा रोपट्याचा आज एवढा मोठा महाकाय वटवृक्ष स्थापन झाला आहे.

आज मोरया महिला प्रतिष्ठानचा नुतन महिला पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ  कांचन ढोरे, नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे आणि सर्व आजी, माजी संचालिका यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रतिष्ठानची महिला पदाधिकारी कार्यकारणी हि सन २०२२ ते २०२४ या कालावधीसाठी मर्यादीत असेल.

नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्षा  अबोली ढोरे, कार्याध्यक्षा चेतना ढोरे, उपाध्यक्षा प्रतिक्षा गट, सचिव ज्योती सुगराळे, सहसचिव. गीता वाडेकर, चिटणीस शितल ढोरे, मिनाक्षी ढोरे,  जयश्री जेरटागी, खजिनदार सारिकाताई धुमाळ, सहखजिनदार प्रमिला पोटे, प्रसिद्धीप्रमुख  कांचन ढमाले, नयना भोसले, संचालिका  कविता नखाते, सोनाली मोरे,  शर्मिला ढोरे,  पुनम जाधव, स्वाती चव्हाण,  छाया जाधव,  जान्हवी ढोरे, सुरेखा खांडभोर,  ज्योती खिलारे, कुंदा ढोरे,स्नेहल पाटील यासर्वांची नियुक्ती आज सर्वानुमते करण्यात आली.

गेल्या सलग पाच वर्षापासून मोरया महिला प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जपत जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा याच जबाबदार वृत्तीने आपण समाजाचे काही देणे लागतो ह्याच इच्छाशक्तीने शहरात महिला भगिनींसाठी विविध स्पर्धात्मक प्रशिक्षण आणि विविध उपक्रमांचे आयोजन करत असते.

याचाच भाग म्हणून दरवर्षी सणासुदीला महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच कुटुंबाला थोडाफार हातभार लागावा या हेतूने “फराळ बनवा व रोजगार मिळवा” हा सुस्त्य उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येतो तसेच याव्यतिरीक्त मोफत नर्सिंग कोर्स, ई लर्निंग कोर्स, शहरातील हौसिंग सोसायटी व वेगवेगळ्या परिसरात बचत गट स्थापन करून राखी बनवणे, गणपती मूर्ती सजावट, साडी विणकाम इत्यादी स्वरुपाचे उपक्रम राबविणे, कोराना काळापासून ते आतापर्यंतही विविध आँनलाईन स्पर्धा, महिला सक्षमीकरण व्याख्यान, हळदीकुंकू, लक्की ड्रा, महिला सन्मान, पूरग्रस्तांना मदत, शाडू मातीचे गणपती बनवणे, फँशन डिझाईन अशा अनेक विविध प्रशिक्षण कोर्सचे आयोजन करण्यात येते.

सर्व नवनियुक्त संचालक मंडळ शहरातील सर्व सामान्य महिला भगिनींचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर असतील अशी अपेक्षा नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी व्यक्त केली.प्रास्ताविक चेतना ढोरे, सूत्रसंचालन नगरसेविका पूनम जाधव, आभार अबोली ढोरे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!