आरोग्य व शिक्षण

लोणावळ्यात पाच मानाच्या गणपती सह घरगुती व सार्वजनिक गणपती मंडळांच्या गणेशमुर्तीची साधेपणाने लहान मंडपात प्राणप्रतिष्ठा

Spread the love

लोणावळा : लोणावळ्यात पाच मानाच्या गणपती सह घरगुती व सार्वजनिक गणपती मंडळांच्या गणेशमुर्तीची साधेपणाने लहान मंडपात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मानाचा पहिला गणपती श्री रायवूड गणेश मंडळाचा गणपती ,दुसरा श्री तरूण मराठा मंडळाचा गणपती , तीसरा श्री रोहिदास तरूण मंडळ , चवथा श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा , गवळीवाडा गणपती , पाचवा मानाचा गणपती श्री शेतकरी भजनी मंडळाचा , वलवण , सहावा मानाचा गणपती श्री राणाप्रताप नेताजी मिञ मंडळ आदी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मावळात भव्य देखावे करणाऱ्या व मावळचा राजा श्री शिवाजी मिञ मंडळ , तसेच श्री नेहरू मिञ मंडळ यांचे गणेशमुर्तींची लहान मंडपात प्राणप्रतिष्ठा झाली. अष्टविनायक , मिञ मंडळ , श्री तुफान मिञ मंडळ , श्री तानाजी मिञ मंडळ , तसेच तुंगार्लीतील श्री सिध्दीविनायक मिञ मंडळ व ओंकार मिञ मंडळ तसेच शंभर वर्षापूर्वी स्थापन झालेले भांगरवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश मंदिर व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , मारुती मंदिर असे गणपती सह पन्नास पेक्षा जास्त सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली..लोणावळा नगरपरिषदेच्या कर्मचारी मंडळांच्या गणपतीची ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!