आरोग्य व शिक्षण

लोणावळा काँग्रेसचे वतीने आयोजित शरिरसौष्ठव स्पर्धेत अविनाश खैरे लोणावळा श्री ;तर महेश भिंगारकर काँग्रेस श्री चा मानकरी

Spread the love

लोणावळा: मावळात कोरोनाचा रूग्ण शुन्यावर आल्याने लोणावळा काँग्रेसचे वतीने आयोजित शरिरसौष्ठव स्पर्धेत अविनाश खैरे लोणावळा श्री ;तर महेश भिंगारकर काँग्रेस श्री चा मानकरी ठरला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांचे प्रमुख उपस्थितीमधे या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी गवळीवाडा येथून भाजीबाजार पर्यत युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी रॕली काढली होती. उद्घाटन समारंभाला काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड , महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कविश्वर, माजी सभापती जितेंद्र कल्याणजी , योगेश गवळी , मंगेश बालगुडे , दर्शन लोंढे आदींच्या  उपस्थितीत झाले.

 


.१) ५५ वजन गटात -आकाश निंबळे , २) ६० किलो वजन गटात -योगेश पाटील, ३) ६५ किलो वजन गटात-जय भोईर , ४) ७० किलो वजन गटात:- श्रीकांत पाटील , ५) ७५ किलो वजन गटात-महेश भिंगारकर ; तर खुल्या वजन गटात -उदय देवरे यांनी बक्षिस पटकावला. मिस्टर इंडिया हा किताब अतुल आंब्रे हे स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले. सर्व पदक विजेत्यांचा रोख रक्कमेची बक्षिसे व सन्मानचिन्ह देवून मान्यवरांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कविश्वर , लोणावळा शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड , आमोल ओंबळे , माजी नगराध्यक्ष राजूशेठ गवळी , शहर काॕँग्रेस कमिटीचे रवि सलोजा ,जंगबहाद्दर बक्षी, जितेंद्र कल्याणजी , दर्शन लोंढे , योगेश गवळी , आकाश परदेशी , पप्पू औरंगे, निखिल तिकोणे , शरिरसौष्ठवपटू व युवक काँग्रेसचे पदाधिकारी शिवराज मावकर , केतन जाधव, फिरोज बागवान ,सनी गवळी , फिरोज शेख, फकीर गवळी , आभिजित लोंढे , ओंकार शिर्के , रिषभ औरगे ,निखिल दाभाडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!