आरोग्य व शिक्षण

शेकडो शिवज्योत घेऊन येणाऱ्या मावळ्यांनी घेतले छञपती शिवाजी महाराज यांचे दर्शन

हिंदू समितीकडून आणी शिवसेनेकडून कौतुक व सत्कार

Spread the love

लोणावळा : शेकडो शिवज्योत घेऊन येणाऱ्या मावळ्यांनी छञपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले व हिंदू समितीकडून व शिवसेनेकडून कौतुक करण्यात येवून सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातून असलेल्या गावोगावच्या व शहरांतील मंडळांच्यावतीने मावळातील लोहगड , विसापूर , तुंग , तिकोना , कोराईगड , राजमाची या किल्यावरून आणलेल्या शिवज्योती घेवून मावळे आले.. लोणावळ्याच्या छञपती शिवाजी महाराज चौकात शिवज्योती घेवून आलेल्या कुसगाव , कुसगाववाडी , प्रेमनगरचे , ओळकाईवाडी , डोंगरगाव , डोंगरगाववाडी , तुंगार्ली , बोरज,पाटण,वरसोली , औंढोली , औंढे , आदी गावोगाव ची मंडळे शिवज्योती घेवून आले त्यांचे स्वागत हिंदू समिती व शिवसेना लोणावळा शहरचे वतीने करण्यात आले.

यावेळी या भागात फुलांनी , व विद्युत रोषणाई केल्यामुळै चैतन्य आले होते. हिंदु समितीकडून चंद्रहास गाडे, रूपेश नांदवटे , सुनिल गायकवाड , दिपक कांबळे , उल्हास पाळेकर , आदींनी स्वागत केले. शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक , जयंती महोत्सव अध्यक्ष श्रीकांत कंधारे , उपशहरप्रमुख , पदाधिकारी , मनेष पवार , भगवान देशमुख , शीलाताई खञी , संगीता ंकंधारे., राम थरकुडे तसेच कार्यकर्ते यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!