आरोग्य व शिक्षण

पिंपरी चिंचवड मधील वीज समस्येवर कायमचा तोडगा काढा – आमदार महेश लांडगे

मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर केले आंदोलन

Spread the love

पिंपरी : औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील विविध समस्यांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

यासंदर्भात राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील महापारेषण यांच्या भोसरी उपकेंद्रातील पावर ट्रांसफार्मर मध्ये बुधवारी सकाळी बिघाड झाला. यामुळे भोसरी व आकुर्डी मधील जवळपास साठ हजार ग्राहकांकडे तसेच साडेसहा हजार लघुउद्योगांतील वीज गायब झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.गेल्या काही दिवसांपासून महावितरण महापारेषण कर्मचाऱ्यांकडून अत्यंत बेजबाबदारपणे काम केले जात असल्याने वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे कारखान्याचे उत्पादन मंदावले असून शहरी उद्योगांच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे.

सध्या कडक उन्हाळा सुरू झाल्याने उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. भोसरीत वीज पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने दिलेला संपर्क क्रमांक सतत व्यस्त व नॉटरिचेबल असतो.महावितरणचे अधिकारी वीज खंडित झाल्यावर उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तरी पिंपरी चिंचवड शहरातील विविध समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी आमदार लांडगे यांनी केले आहे.

विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन 

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध समस्यांबाबत महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यवर बसून आंदोलन केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!