महाराष्ट्रसामाजिक

खालापूर येथील ईर्शाळवाडीत चौथ्या दिवशी मदत व बचाव कार्य थांबवण्याचा सरकारचा निर्णय..

रायगड जिल्हाधिकारी यांचेकडून १४४ कलम लागु..

Spread the love

खालापूर येथील ईर्शाळवाडीत चौथ्या दिवशी मदत व बचाव कार्य थांबवण्याचा सरकारचा निर्णय;रायगड जिल्हाधिकारी यांचेकडून १४४ कलम लागु..Government’s decision to stop relief and rescue operations in Irshalwadi in Khalapur on the fourth day; Section 144 was applied by Raigad Collector..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, २३ जुलै.

खालापूर येथील ईर्शाळवाडीत चौथ्या दिवशी मदत व बचाव कार्य थांबवण्याचा सरकारने निर्णय घेतला.गेली चार दिवस एन डी आर एफ आणि टी डी आर एफ तर्फे तसेच अनेक रेस्कु पथके यांचेतर्फे ईर्शाळवाडीवर झालेल्या भीषण दरडीत सापडलेल्या नागरिकांना ढिगारे उपसून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. सुमारे १२४ लोकांना वाचविण्यात यश आले;तर आज दोन मृतदेह दरडीचे ढिगा-याखालून बाहेर काढण्यात आले.आजपर्यंत  मृतांचा आकडा २९ झाला आहे. या टेकडीवर सुमारे सातशे आठशे एनडीआरएफचे जवान, टीडीआरएफचे जवान तसेच विविध रेस्कु आॕपरेशन करणा-या, बचाव कार्य करणा-या टीम काम करीत होत्या.चार दिवस झाल्याने मृतांची आकडेवारी २७ होती.आज दोन मृतदेह काढल्यानंतर ती २९ झाली. आद्यापही या दरडीखाली सुमारे ७६ लोक असल्याची शक्यता राज्य सरकारने गृहीत धरली आहे.

मृतदेहांचे दरडीचे खालून परिसरात दुर्गंधीयुक्त वास येत असल्यामुळे येथे मदतकार्य व शोधकार्य करणा-या पथकांना औषधे पुरवण्यात येत आहेत.या ठिकाणी लोकांनी येऊ नये म्हणून रायगड जिल्हाधिकारी यांचेकडून १४४ कलम लावण्यात आले आहे. ईर्शाळवाडी दुर्घटनेमधेमृतांंचे नातेवाईकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तसेच लहान अनाथ मुला मुलींच्या पालनपोषण व उच्च शिक्षणाची व त्यांचे विवाहाची जबाबदारी येथील खासदार श्रीकांत शिंदे फौडेशन तर्फे घेण्यात आल्याचे येथे सांगण्यात आले.

ईर्शाळवाडी परिसरात पाऊस धुवाधार बरसत आहे.त्यामुळे मदतकार्य व बचाव आणि शोधकार्यात अनंत आडचणी येत असून येथील पुनर्वसन  तेव्हा होईल , पण येथील ज्यांचे आई , वडील, भाऊ, बहीण, चुलते, सासरे, सासू, कुणाची सून, कुणाचे लहान बाळ, कुणाची शाळकरी मुले यांचा दरडीत मृत्यू झाल्याने सगळे आभाळ कोसळलेल्या या ग्रामस्थांचे दुःख फार मोठे आहे.

किती गुण्या गोविंदाने राहणारे हे गाव आचानक धरतीचे उदरात गडप झाले आहे. येथील लहान मुलांचे खेळण्यातील खेळणे घेऊन त्यावर बसून दुडूदुडू पळणारा व्हिडीओ पाहिला कि हे किती निसर्गाच्या संगतीत एकरूप झालेले लोक होते .किती आनंदी येथली मुले होती.पण सारे सारे सर्व झोपेत असतानाच होत्याचे नव्हते झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!